नाशिक

जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

CD
मस्ट फोटो : 29152 नंदुरबार ः शस्त्रक्रियेनंतर मणक्याचा त्रास कमी झाल्याने आनंद व्यक्त करताना रुग्ण. ----------------------------- जननायक बिरसा मुंडा महाविद्यालयात अकरा रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया नंदुरबार, ता. ९ : येथील जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागातर्फे ‘द स्पाईन फाउंडेशन’ यांच्या सहकार्याने झालेल्या मणक्याच्या शस्त्रक्रिया शिबिरात एकूण ११ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्णांची वैद्यकीय पथकाकडून देखरेख करण्यात येत आहे. डॉ. शेखर भोजराज, डॉ. शीतल मोहिते, डॉ. तुषार देवरे, डॉ. मंदार बोर्डे आणि डॉ. जयेश भानुशाली तव त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी केली. या वेळी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, उपअधिष्ठाता डॉ. जोतीकुमार बागूल यांनी संयोजन केले. अस्थिव्यंगोपचार विभागातील डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. भारत कोवे, डॉ. महेश मुथा, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. योगेश बोरसे, डॉ. प्रसाद सुले, डॉ. गुलाबसिंग पावरा, डॉ. मीनाक्षी कलम, डॉ. मनोज पवार व सहकाऱ्यांनी मदत केली. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ओटी नर्सिंग टीमचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला. नीलिमा वळवी, प्रभारी प्रियांका वळवी, स्टाफ नर्स प्रिया नाईक, साक्षी बाखळे, स्टाफ नर्स काजल शिंदे, एसबी सुमित गावित आणि त्यांच्या टीमने शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांच्या व्यवस्थापनात मदत केली. कोट----- फोटो : 29118 नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील रुग्णांना मणक्याच्या विकारांसाठी तज्ज्ञांची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी, हा या शिबिरामागील उद्देश होता. यामुळे गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळाले तसेच येथील वैद्यकीय पथकाला मुंबईतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. भविष्यातही जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न राहील. - डॉ. संजय राठोड, अधिष्ठाता, जननायक बिरसा मुंडा शासकीय महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT