NSK26H29119
जळगाव : रोटरी रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टची नुकतीच स्थापना करण्यात आली. क्लबच्या पहिल्याच पदग्रहणप्रसंगी नवीन पदाधिकाऱ्यांसह प्रांतपाल डॉ. राजेश पाटील व मान्यवर.
-----
‘रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्ट’ स्थापन
उपशीर्षक
अध्यक्षपदी रोहित आहुजा; कासट, तलरेजा सचिव
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : समाजसेवेच्या माध्यमातून जळगाव शहरासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा उदघाटन सोहळा उत्साहात पार पडला.
रोटरीच्या भैयासाहेब नथमलजी लुंकड सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, रोटरी असिस्टंट गव्हर्नर ॲड. सागर चित्रे, माजी प्रांतपाल डॉ. सिकची, नाना शेवाळे, राजेंद्र भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट डॉ. राजेश पाटील यांच्याहस्ते रोहित आहुजा यांनी क्लबचे चार्टर प्रेसिडेंटपद स्वीकारले. तसेच धनराज कासट व पुनीत तरलेजा यांनी चार्टर सेक्रेटरीपदाची जबाबदारी स्वीकारली.
चालू वर्षासाठी क्लबच्या संचालकांची निवडही या वेळी करण्यात आली. यामध्ये ट्रेझरर सीए सौरभ शाह, व्हाईस प्रेसिडेंट सरिता झावर, तसेच पूनम वर्मा, योगेश सांखला, निकुंज अग्रवाल, विनीत आहुजा, दर्शन जैन, पराग बेदमुथा, मयूर ओसवाल, तुषार भांबरे, प्रकाश मुळे आणि डॉ. महेंद्र मल्ल यांचा समावेश आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांना क्लबचे मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टला सुरुवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून क्लबची सदस्यसंख्या ६२ झाली आहे. यामध्ये ११ महिला सदस्यांचा समावेश आहे.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.