नाशिक

नियमबाह्य वसूल केलेले अतिरिक्त व्याज सभासदांना परत मिळणार

CD
पतसंस्थेने नियमबाह्य वसूल केलेले अतिरिक्त व्याज सभासदांना मिळणार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ९ : धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेकडून नियमबाह्य पद्धतीने वसूल करण्यात आलेले अतिरिक्त व्याज संबंधित सभासदांना परत करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल ४४२ सभासदांना सुमारे ११ लाख रुपयांचा व्याज परतावा मिळणार असल्याची माहिती पतसंस्थेचे संचालक विनोद पाटील यांनी दिली. पतसंस्थेकडून नियमबाह्य व्याजवसुली होत असल्याबाबत नितेंद्र चौधरी व शुभांगी सोनवणे यांनी मुख्यमंत्री तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी पतसंस्थेच्या चेअरमनला सात दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने वसूल केलेले अतिरिक्त व्याज परत करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला केवळ तक्रारदार नितेंद्र चौधरी व शुभांगी सोनवणे यांनाच अतिरिक्त व्याजाचा धनादेश देण्यात आला होता. मात्र, हा लाभ केवळ दोन तक्रारदारांपुरता मर्यादित न ठेवता धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व संबंधित सभासदांना मिळावा, अशी भूमिका शिक्षक परिषदेने घेतली. त्यासाठी मुख्यमंत्री तक्रार निवारण पोर्टल तसेच निबंधक कार्यालयाकडे प्रांत, विभाग व जिल्हास्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. टप्प्याटप्प्याने कर्ज वितरित झालेल्या तसेच जामीनकी कर्ज घेणाऱ्या सभासदांकडून नियमबाह्य पद्धतीने वसूल झालेले अतिरिक्त व्याज परत करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ४४२ सभासदांना सुमारे ११ लाख रुपये परत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात झाली. सुनावणीवेळी तक्रारदार नितेंद्र चौधरी, राकेश आव्हाड, पतसंस्थेचे संचालक विनोद पाटील व जनरल मॅनेजर अनिल पाटील उपस्थित होते. यासाठी प्रांत सहकार्यवाह राकेश आव्हाड, विभाग सहकार्यवाह किरण घरटे, जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी, जिल्हा सहकार्यवाह दीपक वसावे, जिल्हा कोषाध्यक्ष शरद घुगे, जिल्हा प्रवक्ते जगदीश पाटील, जिल्हा संघटनमंत्री किशोर ठाकरे व तालुकाध्यक्ष सुनील पाडवी यांनी पाठपुरावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT