नाशिक

आयआयए नाशिक सेंटरच्या अध्यक्षपदी आर्कि. चौधरी

CD
फोटो : H29150 नाशिक : आयआयए नाशिक सेंटरची नूतन कार्यकारणी. --------------- ‘आयआयए’ नाशिकच्या अध्यक्षपदी अमोल चौधरी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (आयआयए), नाशिक सेंटरची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत अमोल चौधरी यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे. नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी स्मिता कासार, सचिवपदी रोहिणी मराठे आणि खजिनदारपदी निखिल पाळेकर यांची निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून विजय पवार, सुरुची पाटील, शहानवाज मणियार, मैत्रेय कुटे आणि विवेक विभूते यांची निवड झाली आहे. आयआयए ही ११० वर्षे जुनी संस्था असून देशभर संस्थेच्या शाखा आहे. चौधरी यांना आर्किटेक्चर क्षेत्रातील २१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, या अनुभवाचा उपयोग नाशिक सेंटरच्या आगामी कार्यकाळात सकारात्मक आणि परिणामकारक कामासाठी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आर्किटेक्चर क्षेत्र सध्या मोठ्या स्थित्यंतरातून जात असून, आगामी काळात या क्षेत्रासमोर अनेक नवी आव्हाने आणि संधी आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुयोग्य आणि प्रभावी वापर, महापालिका व इतर शासकीय यंत्रणांशी संबंधित दैनंदिन अडचणी, बदलते शासकीय नियम व धोरणे, बांधकाम क्षेत्रातील नवनवीन उत्पादने व तंत्रज्ञान, तसेच आर्किटेक्ट्स ॲक्टमधील प्रस्तावित बदल व त्या बदलांच्या अनुषंगाने आर्किटेक्ट तसेच आर्किटेक्चरबद्दल जागरूकता वाढवणे, अशा विविध विषयांवर नव्या कार्यकारिणीमार्फत काम केले जाणार आहे. या सर्व विषयांवर सेंटरच्या सभासदांशी संवाद साधून, त्यांची मते व सूचना जाणून घेत सर्वसमावेशक आणि सर्वानुमते निर्णय घेण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे चौधरी यांनी सांगितले. संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी इंदोर येथील जितेंद्र मेहता यांची तर महाराष्ट्र अध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर येथील सुनील भाले व कार्यकारिणी सदस्यपदी नाशिकचे योगेश महाजन यांची निवड झाली. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल कारखानीस यांच्‍यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT