नाशिक

श्रींच्या स्थापनेपुर्वीच पोलिसदलाचे वॉश आऊट

CD
टुडे एक NSK26H29155 जळगाव : जिल्‍हाभरात भंगार गुदामांची पाहणी करताना पोलिस. --- ‘श्रीं’च्या स्थापनेपूर्वीच पोलिसदलाचे ‘वॉश आऊट’ जळगाव जिल्ह्यात एकाच वेळेस कोम्बिंग; भंगार दुकाने, गुन्हेगारांची झाडाझडती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : मालमत्ताविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासह अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात एकाचवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सराईत आरोपी, वाहने व भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. कारवाईत ३६ अवैध धंदेचालकांवर कारवाई करून सुमारे १० लाख ६० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. जिल्हा पोलिस दलातर्फे (ता. ७) संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी प्रतिबंधात्मक ऑपरेशन राबविण्यात आले. ही मोहीम पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली. तसेच संशयास्पद वाहनांसह भंगार दुकानांची तपासणी करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. अवैध धंद्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करीत दारुबंदी, एनडीपीएस, आर्म्स ॲक्ट व अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या मोहिमेत १५७ भंगारच्या दुकाने, २८१ रेकॉर्डवरील आरोपी, ७४२ संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. तर ५ जणांविरुद्ध मुंबई पोलिस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करुन २३ जणांना एनबीडब्ल्यू वॉरंटची बजावणी करण्यात आली. चौकट दारू विक्रेत्यांवर कारवाई जिल्हाभरात ३६ अवैधरित्या गावठी व देशी-विदेशी दारू विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यात ७३८ लिटर गावठी दारू, ६१३० लिटर कच्चे रसायन तर १६४ देशी-विदेशी व बियर बाटल्या असा एकूण ४ लाख ७८ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच कोयता घेऊन फिरणाऱ्यासह वाळू वाहतूक करणाऱ्या डंपवर कारवाई करून १० लाख रुपयांचे डंपर आणि १५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT