NSK26H29094 (जोडून फोटो आहेत एखादा फोटो क्राप करून घ्यावा)
जळगाव : अवैध दारुविक्रीविरोधात कारवाई करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केलेला मुद्देमाल व वाहने.
अवैध दारूविक्रीवर ‘उत्पादन शुल्क’ची धडक
ऑगस्टमध्ये १७१ गुन्हे; १४१ जणांवर कारवाई, ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑगस्ट महिन्यात धडक मोहीम राबविली. जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत १७१ गुन्हे नोंदविण्यात आले असून, १४१ संशयितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ४६ लाख एक हजार १७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध मद्यनिर्मितीच्या अड्ड्यांवर छापे टाकून हातभट्टी दारू, देशी दारू, ताडी, बिअर तसेच मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन जप्त करण्यात आले. अवैध दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ११ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे.
लाख लिटर कच्चे रसायन नष्ट
हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल व रसायन मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आले. या कारवाईत तब्बल १ लाख १७ हजार ३८५ लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. त्यामुळे अवैध हातभट्टी निर्मितीला मोठा आळा बसल्याचा दावा विभागाने केला आहे.
असा आहे जप्त मद्यसाठा
२.९२४ लिटर देशी दारू, ४२९.८४ लिटर ताडी, २१५ लिटर बिअर, २८.९४ लिटर, जप्त वाहने ११.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.