फोटो : 29171
नंदुरबार ः अभिवादन कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत रघुवंशी. शेजारी प्रा. डॉ. विश्वास पाटील, ॲड. केतन शाह, कीर्तिकुमार सोलंकी, प्रा. राजेंद्र शिंदे आदी.
-----------------------
टिळक वाचनालयात
बालशहिदांना अभिवादन
नंदुरबार : येथे शहीद स्मृती, लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालय, नंदुरबार जिल्हा शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघ समन्वय समितीतर्फे शहीद दिनानिमित्त टिळक वाचनालयात बालशहिदांना अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रतिमापूजन करण्यात आले. आमदार चंद्रकांत रघुवंशी, प्रा. डॉ. विश्वास पाटील, शहीद स्मृतीचे उपाध्यक्ष कीर्तिकुमार सोलंकी, वाचनालयचे उपाध्यक्ष ॲड. केतन शाह उपस्थित होते.
आमदार रघुवंशी यांनी शहीद स्मृती संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. प्रा. डॉ. विश्वास पाटील यांनी बालशहिदांविषयी माहिती दिली. पुष्पेंद्र रघुवंशी, डी. पी. महाले, प्रा. गणेश सोनवणे, एस. एन. पाटील, अंकुश रघुवंशी, प्रदीप पारेख, मिलिंद माळी, रमाकांत पाटील, प्रवीण पाटील, कैलास मराठे, प्रशांत बागूल, गणेश पाटील, विजय पाटील आदी उपस्थित होते. हेमंत पाटील यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. निंबाजीराव बागूल यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजेंद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तुषार सोनवणे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.