नाशिक

राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील ८०० खेळाडूंचा सहभाग

CD
फोटो : 29173 नंदुरबार : स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंसमवेत प्रमोद चांदूरकर, प्रफुल्ल डांगे, बळवंत निकुंभ, प्रशांत बागूल, जगदीश वंजारी, राजेश्वर चौधरी, नीलेश गावित, भगवान पवार. --------------------------- राज्य धनुर्विद्या स्पर्धेत ८०० खेळाडूंचा सहभाग रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे आयोजन नंदुरबार, ता. १० : रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटना व नंदुरबार जिल्हा धनुर्विद्या संघटनेतर्फे २३ वी कनिष्ठ गट (ज्युनिअर गट) राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा जिल्हा क्रीडासंकुलात झाली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील ८०० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर, कोशाध्यक्ष रंगराव साळुंखे, बळवंत निकुंभ, श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत बागूल, रोटरी क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी, मीनल वळवी, जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव भागूराव जाधव, जिल्हा टेनिस क्रिकेट संघटनेचे सचिव जगदीश वंजारी, सचिव राजेश्वर चौधरी, सचिव भगवान पवार, नीलेश गावित उपस्थित होते. इंडियन रिकव्हर प्रकारात यश पाटील, प्रसाद भानगे, संस्कार खिलारे यांनी यश मिळविले. इंडिव्हिज्युअल ॲलिमेशनमध्ये यश पाटील, शिवतेज पिंगळे, शौर्य चव्हाण, टीम ॲलिमेशनमध्ये अमरावती, वाशीम, सातारा संघाने यश मिळवले. मुलींच्या गटात दिव्या बॅनर्जी, श्रावणी पवार, समृद्धी तायडे, इंडिव्हिज्युअल ॲलिमेशनमध्ये दिव्या बॅनर्जी, आकांक्षा घाडगे, थान्सी लाखे यांनी यश मिळवले. टीम ॲलिमेशनमध्ये अमरावती, अहिल्यानगर, अकोला संघाने विजय मिळविला. मिक्स डबलमध्ये शौर्य चव्हाण, श्रावणी पवार, अजिंक्य फडके व जिज्ञाशा भारंबे, देवकरण जराड व आकांक्षा घाडगे यांनी यश मिळविले. कंपाउंड राउंड स्पर्धेत वैष्णवी पाटील, धारा बिडकर, वैदेही जाधव, टीम ॲलिमेशनमध्ये बुलडाणा, सोलापूर, नाशिक, इंडिव्हिज्युअल ॲलिमेशनमध्ये वैष्णवी पाटील, करण खराडे व राजनंदिनी वाघमारे, संपूर्ण स्पर्धेत मानव जाधव, हर्षवर्धन इंगळे, श्रेयश मुंडे, ओमिक भाकडे, ओम खैरे, शार्वीर माने, टीम ॲलिमेशनमध्ये पिंपरी चिंचवड, पुणे, परभणी संघ, रिकर्व राउंड स्पर्धेत वैष्णवी कुलकर्णी, स्वरांजली बनसोडे, इंडिव्हिज्युअल ॲनिमेशनमध्ये वैष्णवी कुलकर्णी, सायली माने, वैष्णवी पवार, टीम ॲलिमेशनमध्ये नाशिक, पुणे, अमरावती, मिक्स डबलमध्ये गौरव पवार, वैष्णवी पाटील, श्रेयश मुंडे व सृष्टी बोरसे, कपिल सतगर्गे व धारा बिडकर, संपूर्ण स्पर्धेत रियांश ठाकूर, आर्यन राठोड, करण सराडे, इंडिव्हिज्युअल ॲलिमेशनमध्ये सोहम बनसोडे, अमय कदम, आर्यन राठोड, टीम ॲलिमेशनमध्ये पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, मिक्स डबलमध्ये विजय यादव व वैष्णवी कुलकर्णी, करण खराडे व राजनंदिनी वाघमारे, शिवम लोंढे व स्वरांजली बनसोडे यांनी यश मिळविले. स्पर्धा यशस्वितेसाठी मयूर पाटील, नीरज माळी, मोहित वारुळे, हर्षल कुंभार, प्रफुल्ल पाटील, व्योम बोरसे, प्रकाश पाटील, मयूर रौंदळ, अमोल चित्ते, आकाश बोडरे, आलोक धनगर व भटू पाटील यांनी प्रयत्न केले. नीलेश गावित यांनी सूत्रसंचालन केले. राजेश्वर चौधरी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT