नाशिक

अयोध्या नगरात संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी

CD
NSK26H29140 जळगाव : अशोकनगर-अयोध्यानगर येथे नाभिक समाज विकास मंडळातर्फे पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित समाजबांधव. .......... अयोध्या नगरात संत सेना महाराजांना अभिवादन पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : नाभिक समाज विकास मंडळातर्फे संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी अशोक नगर, अयोध्या नगर येथील संत सेना महाराज मंदिरात श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली. यावेळी समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या प्रतिमेची आरती करण्यात आली. प्रमुख अतिथी माजी महापौर सीमा भोळे, नगरसेवक पीयूष कोल्हे, माजी उपमहापौर तथा नगरसेवर सुनील खडके, नगरसेवक, हर्षल मावळे, वीरेंद्र खडके, अक्षय सांगळे, गणेश सोनवणे, नरेंद्र सोनवणे, प्रदीप रोटे तसेच नगरसेविका रंजना वानखेडे, वंदना इंगळे, अर्चना पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील सरोदे, सुनील कोल्हे व विजय खोंडे यांची उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक कोल्हे यांनी समाजाच्या एकजुटीचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले. संत सेना महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंद्रकांत सोनगिरे यांनी भूषविले. कार्यक्रम यशस्वितेसाठी भिकन बोरसे, मुरलीधर कुवर, अरुण बोरसे, कमलेश निकम, प्रकाश निकम, उदय पवार, विजय वाघ, तुळशीराम जगताप, युवराज बोरसे, विकास फुलपगारे, सुरेश सोनगिरे, राहुल सूर्यवंशी यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी सहाकार्य केले. मनोहर खोंडे यांनी सूत्रसंचालन केले, तर जगदीश वाघ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT