नाशिक

केशिकाला दोन पदके, नवोदित अधिरा चमकली

CD
फोटो : H29177 वर्धा : अधिरा आहेर, केशिका पुरकर व प्रशिक्षक पुनीत देसाई केशिकाला दोन पदके, अधिरा आहेरला कांस्य महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : नुकत्याच वर्धा येथे झालेल्या चौथ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या केशिका पुरकरने १३ वर्षाखालील मुलींच्या गटाचे सुवर्ण तर १५ वर्षाखालील मुलींच्या गटाचे रौप्य पदक पटकावले. याच स्पर्धेत ११ वर्षाखालील मुलींच्या गटात नवोदित खेळाडू अधिरा आहेरने कांस्य पदक मिळवले. वर्धा येथे झालेल्या स्पर्धेत नाशिकच्या महिला खेळाडूंनी पाच विविध वयोगटात व पुरुष गटामध्ये अशा एकूण सहा गटात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामध्ये नाशिकच्या टेबल टेनिसपटूंनी तीन सुवर्ण व तीन रौप्यपदके मिळवली. १३ वर्षाखालील मुलींच्या एकेरीत नाशिकच्या केशिका पुरकरने अंतिम फेरीत टीएसटीटीए मुंबईच्या वेदिका जयस्वालचा ३-१ ने पराभव करत विजेतेपद पटकावत सुवर्णपदक जिंकले. १५ वर्षाखालील मुलींच्या गटात केशिकाला अंतिम फेरीत परभणीच्या आद्या बाहेतीकडून ३-० ने पराभव स्‍वीकारावा लागल्‍यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ११ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या उदयोन्मुख टेबल टेनिसपटू अधिरा आहेरने कांस्य पदक पटकावले. उपांत्य फेरीत ठाण्याच्या कायरा लेलेशी झालेल्या चुरशीच्या सामन्यात अधिरा आहेरचा २-३ पराभव केल्यामुळे अधिराला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. खेळाडूंच्या यशाबद्दल नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, उपाध्यक्ष राजेश भरवीरकर व मिलिंद कचोळे, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JIO IPO : १० लाख कोटींहून अधिक मूल्यांकनाचा देशातील पहिलाच महा-आयपीओ; ३० लाख कोटींच्या ऐतिहासिक टप्प्याकडे रिलायन्सची वाटचाल

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

Uruli Kanchan Crime : विवाहित महिलेला 'तुमचे पार्सल आले आहे' असा बनाव रचून फोन करायचा, तिच्याशी अश्लील बोलून एकांतात भेटण्याची मागणी करणाऱ्या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : तहसीलदारांची महागाव बँकेत धडक पीक कर्ज प्रकरणांवरून शाखा व्यवस्थापकाची झाडाझडती

Ayodhya Deepotsav 2026 : अयोध्येचा दीपोत्सव कसा बनला जागतिक आकर्षण? योगी आदित्यनाथ यांनी सांगितले महत्त्व

SCROLL FOR NEXT