नाशिक रोड पोलिस ठाण्याजवळ
तीन महिने एसटीचा थांबा
बसस्थानकाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड बसस्थानकाचे काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. येथे बांधकामाला सुरुवात होत असल्याने, पुढील तीन महिने नाशिक रोड स्थानकाचे कामकाज नाशिक- पुणे रस्त्यावरील उड्डाणपुलाखालील नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या परिसरातून चालणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी सूचना जारी केली आहे.
नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या बस नाशिक रोड बसस्थानकात थांबा घेत असतात. याशिवाय येथे रेल्वेस्थानक असल्याने, विविध रेल्वे गाड्यांना जोडून बससेवा उपलब्ध असते. आगामी कुंभमेळ्यानिमित्त शहरात ठिकठिकाणी विकासकामे सुरु असतांना, नाशिक रोड बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिकरोड बसस्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व एसटी फेऱ्या आता नाशिक- पुणे रस्त्यावरील उड्डाणपुलाखाली, नाशिक रोड पोलीस ठाण्याजवळ तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला प्रवासी निवारा आणि नियंत्रण कक्षातून चालवल्या जातील. इतर विभागांतून नाशिक रोड स्थानकात येणाऱ्या बसच्या चालक व वाहकांना या बदलाबाबत तत्काळ सूचना देण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. स्थानकावरील वाहतूक नियंत्रण कक्ष आणि कर्मचारी तात्पुरत्या निवाऱ्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असल्याचेही एसटी प्रशासनाने कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.