सेकंड मेन
NSK26H29183
जळगाव : महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात आढावा घेताना संचालक (संचालन) धनंजय औंढेकर. सोबत मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी व इतर अधिकारी.
.........
वीजगळती रोखा, बिलवसुलीला गती द्या
महावितरणच्या परिमंडल आढावा बैठकीत संचालकांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : ग्राहकांना दर्जेदार सेवा देतानाच महावितरणची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी वीजबिलांची प्रभावी वसुली आणि वितरण हानी कमी करण्यावर विशेष लक्ष द्या, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिले. जळगाव येथील विद्युत भवनात झालेल्या परिमंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता संजय सरग, प्रभारी अधीक्षक अभियंता चेतन नंदनवार यांच्यासह विभागीय कार्यकारी अभियंते, विभागप्रमुख तसेच वित्त व लेखा विभागाचे उपव्यवस्थापक उपस्थित होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ अंतर्गत कृषीपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव परिमंडलातील कृषी वाहिन्यांचे विभक्तीकरण युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना औंढेकर यांनी दिल्या. मिश्र वाहिनीवरील ग्राहकांसाठी एसडीटी बसविण्याच्या कामालाही गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
ग्राहकांमध्ये जनजागृती करा
ग्राहकांना त्यांच्या प्रत्यक्ष वीजवापरानुसार अचूक बिल मिळावे, यासाठी मीटर रीडिंग नियमित होईल याची दक्षता घ्या. सदोष तसेच रीडिंग न होणारे मीटर तातडीने बदलून स्मार्ट मीटर बसवावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
चौकट
वाणिज्यिक हानी कमी करा
थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करूनही अनधिकृत वीजवापर आढळल्यास गुन्हे दाखल करा. वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबवून वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्याचे निर्देशही औंढेकर यांनी दिले. कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.