पान-२ मेन
सर्व फोटो घेणे... (छोटे-छोटे)
फोटो : 29221, 29220, 29219, 29218, 29217, 29223
नंदुरबार : मूर्तिकार नारायण वाघ यांच्या ओमकारा श्री मंगल आर्टमध्ये साकारण्यात आलेल्या गणरायाच्या आकर्षक मूर्ती.
--------------------------
नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
देखाव्यांसाठी मंडपांचे काम जोरात; गणेशमूर्तींना परराज्यातूनही मागणी
नंदुरबार, ता. ९ : लाडक्या गणरायच्या आगमनाला अवघे चार दिवस शिल्लक आहेत. या पार्श्र्वभूमीवर शहर व जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. गणरायाचे स्वागत करण्यासाठी मंडळांसह गणेशभक्तही सज्ज आहेत. बाजारपेठेत गणेशमूर्तीची दुकाने थाटली जात असून, सजावटीसाठी लागणारे साहित्यही बाजारात उपलब्ध आहे. येथील गणेशमूर्तींना सर्वत्र मागणी असल्याने कारखान्यांमध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. कारखान्यांत आगाऊ नोंदणी केलेल्या मूर्ती घेण्यासाठी विविध भागांतील मंडळांचे कार्यकर्ते नंदुरबारात दाखल होत आहेत.
........................
नंदुरबारमधील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीमंत बाबा गणपती मंडळ आणि दादा गणपती मंडळासह शहरातील प्रमुख मंडळांच्या मंडप उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी रोषणाई, आकर्षक देखावे तयार करण्यासाठी कारागीर रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. प्रशासनाकडून मंडळांसाठी उत्कृष्ट स्पर्धा होणार असून, त्यात सहभागी होण्यासाठी मंडळांमध्ये उत्साह आहे.
शहरातील विविध कारखान्यांत गणेशमूर्तींवर मूर्तिकार शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींनाही विशेष पसंती मिळत आहे. मूर्ती घेण्यासाठी कारखान्यांत गर्दी होत आहे.
जिल्ह्यातील गणेशमूर्तींची मागणी सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रसह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतूनही नंदुरबारातील मूर्तींना मागणी असते. जिल्ह्यात सुमारे दोन ते तीन हजार मूर्ती बनविण्याचे कारखाने असून, दोन हजारांपेक्षा अधिक कारागीर मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहेत. सहा इंचापासून २५ फुटांपर्यंतच्या मूर्ती येथील कारखान्यांत तयार होत आहेत.
यावर्षी जिल्हाभरातून सुमारे ३० हजारांपेक्षा अधिक मूर्तींची आगाऊ बुकिंग सुरू आहे. उत्सव काळात जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात व राज्यात नंदुरबारातून एक लाखापेक्षा अधिक मूर्तींची विक्रीची शक्यता आहे.
गणेशोत्सवासाठी लागणारे पूजेचे साहित्य, मखरे, आरास, कंठी, तोरणे आणि सजावटीच्या साहित्याने येथील मुख्य बाजारपेठ सजली आहे. त्याचप्रमाणे तसेच गणरायाच्या आवडीचे मोदक आणि मिठाईसाठी दुकानांमध्ये गर्दी वाढत आहे. शहरातील विविध भागांत गणेमूर्ती विक्रीचे स्टॉल असून, मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
.........
चौकट
प्रशासन, पोलिस यंत्रणा सज्ज
उत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि विसर्जन मार्ग सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. महावितरण आणि पालिकेकडून लोंबकळणाऱ्या तारा, रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याचे काम वेगाने सुरू आहे. गणेशोत्सवामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्हा भक्तीच्या रंगात न्हाऊन निघणार आहे.
..........
कोट----
येथील गणेशमूर्तींना महाराष्ट्रासह विविध राज्यांत मागणी असते. मूर्ती तयार करण्यासाठी कारखान्यांमध्ये कारागिर रात्रंदिवस काम करीत आहेत. हवी तशी मूर्ती तयार करून मिळत असल्याने गणेश मंडळे आणि भाविकांकडून मूर्तींची सहा महिने आधीच बुकिंग असते. विविध रंग, सजावटीचे सामान महागल्याने यंदा मूर्तींच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
- नारायण वाघ, मूर्तिकार, नंदुरबार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.