NSK26H29199
जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आयोजित कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांसह, कार्यशाळेत मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ, प्रमुख अतिथी डॉ. उल्हास पाटील आदी.
-----
वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
उपशीर्षक
कार्यशाळेत मंथन; डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात आयोजन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगातर्फे (एनएमसी) दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात झाली. वैद्यकीय शिक्षणामध्ये क्षमता-आधारित वैद्यकीय शिक्षण (सीबीएमई) अभ्यासक्रमाची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेत २७ प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सीआयएसपी हा वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या क्षमता वृद्धीसाठी राबविण्यात येणारा महत्त्वपूर्ण प्राध्यापक विकास कार्यक्रम असून पारंपरिक अध्यापन पद्धतीऐवजी कौशल्याधारित, व्यावहारिक आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, संचालक डॉ. नारायण आर्वीकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके आणि रजिस्ट्रार प्रमोद भिरूड,कार्यशाळेचे समन्वयक डॉ. नंत बेंडाळे आणि राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाच्या निरीक्षक डॉ. प्रेमा जोशी आदी उपस्थित होते.
१४-१
यांनी केले मार्गदर्शन
कार्यशाळेत डॉ. माया आर्वीकर, डॉ. शुभांगी घुले, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. सारंग दयाभाई, डॉ. बापुराव बिटे आणि डॉ. आलोक यादव यांनी पायाभूत अभ्यासक्रम, प्रारंभिक नैदानिक अनुभव, एकात्मिक अध्यापन, कौशल्य प्रशिक्षण, विद्यार्थी-डॉक्टर पद्धत तसेच मूल्यमापन पद्धती, लॉगबुक आणि ईपेार्टफोलीओ यांच्या प्रभावी अंमलबजावणीवर मार्गदर्शन केले. ट्रेन द ट्रेनर या संकल्पनेतून प्राध्यापकांची अध्यापन क्षमता अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यशाळेत ९ वक्ते, १ मुख्य अतिथी, १२ कॉलेज अतिथी, २७ प्राध्यापक, २० कर्मचारी आणि ६ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.