नाशिक

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करा

CD
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करा मॅगमोचा आंदोलनाचा इशारा : राजकीय हस्तक्षेपाविना भयमुक्त वातावरणाची मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञांच्या विविध प्रलंबित मागण्यांवरून महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटना (मॅगमो) आक्रमक झाली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे तास निश्चित करावेत, वैयक्तिक द्वेषातून किंवा राजकीय हेतूने होणाऱ्या तक्रारींवरील थेट कारवाया थांबवून निःपक्ष चौकशी व्हावी, तसेच भयमुक्त व राजकीय हस्तक्षेपमुक्त वातावरण मिळावे, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत. दरम्यान, मागण्यांची दखल न घेतल्याने टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचाही इशारा संघटनेने दिला असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आरोग्य उपसंचालक व जिल्हा शल्यचिकित्सकांनाही निवेदन देण्यात आले आहे. संघटनेच्या निवेदनानुसार, सध्या व्यवसाय रोध भत्त्याच्या (एनपीए) आडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना २४ तास कर्तव्यावर बांधून ठेवले जाते आणि त्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप केला जातो. त्यामुळे इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही कामाचे तास निश्चित करण्यात यावेत किंवा व्यवसाय रोध भत्ता ऐच्छिक करून सेवा तासांनंतर अटी व शर्तींसह खासगी प्रॅक्टिसची परवानगी देण्यात यावी, जनआरोग्य समित्यांमधील अशासकीय सदस्यांची निवड करताना स्पष्ट निकष निश्चित केले जावेत. वैयक्तिक द्वेषापोटी किंवा राजकीय हेतूने प्रेरित होऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या आरोपांची सविस्तर चौकशी करूनच न्याय दिला जावा, मंत्री कार्यालयातून थेट होणाऱ्या एकतर्फी कारवाया टाळल्या जाव्यात, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणतेही दडपण न ठेवता भयमुक्त वातावरणात सेवा बजावू द्यावी, अशीही मागणीही करण्यात आली आहे. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनंत पवार, डॉ. बापू बाविस्कर, डॉ. अनंत गायकवाड, डॉ. मोतीलाल पाटील, डॉ. कल्पना शिंदे, डॉ. योगेश मोरे, डॉ. सुशील शिंदे, डॉ. मोहन बच्छाव, डॉ. सुधीर पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. राज्यव्यापी आंदोलनाची रूपरेषा -७ ते ९ सप्टेंबर : काळ्या फिती लावून दैनंदिन काम केले. -​१० सप्टेंबरपासून : ऑनलाइन पोर्टल व अहवाल (रिपोर्टिंग) सादर करण्यावर बहिष्कार -१५ सप्टेंबर : सामुदायिक रजा व एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन -​१६ सप्टेंबरपासून : सर्व प्रत्यक्ष व व्हीसीद्वारे होणाऱ्या बैठकांवर बहिष्कार -​२१ सप्टेंबरपासून : बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू -​२५ सप्टेंबरपासून : एमएलसी व शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) सेवा बंद -२८ सप्टेंबरपासून : अत्यावश्यक सेवांसह सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा पूर्णपणे बंद फोटो : H29205 नाशिक : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देताना मॅगमोचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनंत पवार आणि संघटनेचे पदाधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT