हेल्थसाठी टुडे पान-४ लेख
---------------
डॉ. नीलेश पूरकर NSK26H29209
--------------
३६-४
जुन्या फोटो अल्बमपासून ‘आरोग्याची भेट’पर्यंत...
------------
आजच्या धावपळीच्या आयुष्यात बालपण, तरूण्यातील आठवणींना आपण अनेकदा वेळ देत नाही. पण पन्नाशीच्या आसपास पोहोचल्यानंतर लक्षात येतं, की आयुष्याची खरी श्रीमंती मोठ्या घरात, गाडीत किंवा बँकेच्या खात्यात नसते. ती असते आपल्या सोबत आयुष्यभर उभ्या राहिलेल्या माणसांमध्ये. याच भावनेला स्पर्श करणारा एक आगळावेगळा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आरोग्य तपासणीसारख्या गंभीर विषयाला प्रेम, आठवणी आणि नात्यांच्या भावनिक प्रवासाशी जोडण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करण्यात आला आहे.
- डॉ. निलेश पुरकर, हार्ट सर्जन
--------------
कथेची सुरुवात होते एका पन्नाशीच्या आसपासच्या व्यावसायिकापासून. दिवसभराच्या कामानंतर तो आपल्या जुन्या फोटो अल्बमची पानं चाळत असतो. एका फोटोत त्याला स्वतःचं तरुणपण दिसतं आणि त्याच्यासोबत दिसते ती व्यक्ती, जिने त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची साथ दिली. अल्बम बंद करताना त्या व्यावसायिकाच्या मनात एक साधा विचार येतो. आयुष्यात त्याने कुटुंबासाठी कितीतरी गोष्टी केल्या. पण जिच्यासोबत हे सगळं उभं केलं, तिच्यासाठी मी काय केलं? म्हणूनच तो आपल्या पत्नीला एक वेगळी भेट देतो. आरोग्य तपासणीचे कूपन.
ही कल्पना एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधते: आपण आपल्या प्रिय व्यक्तींसाठी घर, शिक्षण, विमा, गाडी, सुट्ट्या आणि कितीतरी गोष्टींची काळजी घेतो; पण त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्याला आपण किती प्राधान्य देतो?
विशेषतः वयाच्या ४०-४५ वर्षांनंतर जीवनशैलीशी संबंधित अनेक आजार हळूहळू विकसित होऊ शकतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, फॅटी लिव्हर किंवा हृदयविकाराचा धोका सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणे न देता वाढू शकतो. त्यामुळे "मला काही त्रास नाही" हे नेहमीच ‘मी पूर्णपणे निरोगी आहे" याचे प्रमाण नसते. ज्या शरीराच्या आधारावर आपण संपूर्ण आयुष्य जगतो, त्याची तपासणी वेळेवर का करू नये? कदाचित म्हणूनच या व्हिडिओचा शेवट आरोग्याच्या जाहिरातीने होत नाही. तो एका भावनेने होतो.
" तुझ्यासोबत अजून खूप जगायचं आहे."
ही केवळ पती-पत्नीची भावना नाही. ती प्रत्येक त्या व्यक्तीची भावना आहे, जिला आपल्या प्रिय माणसांसोबत अजून अनेक सकाळी, अनेक प्रवास, अनेक सण, अनेक गप्पा आणि असंख्य छोट्या आठवणी जगायच्या आहेत. आठवणी जपण्यासाठी फोटो अल्बम पुरतो. पण पुढच्या आठवणींसाठी आरोग्य जपावं लागतं. याच विचारातून आरोग्यसंपदाने जोडप्यांसाठी आरोग्य तपासणीला एक भावनिक भेट म्हणून मांडणारा हा उपक्रम सुरू केला आहे. कारण काही भेटवस्तू उघडल्यावर संपतात. पण आरोग्याची भेट मिळाली, तर कदाचित त्यातून अजून अनेक वर्षांची साथ मिळू शकते.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.