नाशिक

नंदुरबारात आज जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन

CD
पान-१ मेन (गरज भासल्यास एआय गुतुंवणूकपरिषद फोटो घेणे...) उदय सामंत यांचा फोटो घेणे... नंदुरबारला आज जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती नंदुरबार, ता. ९ : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासह जिल्ह्यातील गुंतवणुकीच्या संधी वाढविणे, नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्याचे उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. १०) सकाळी दहाला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होणार आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) नीलेश गायकवाड यांनी दिली. ........... या परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील गुंतवणूकदार, उद्योजक तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. परिषदेत जिल्ह्यातील विविध गुंतवणूकदारासोबत सुमारे १५० ते २०० सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. तसेच दुपारी साडेचारला उद्योजकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात बैठक होणार आहे. बैठकीत जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, गुंतवणूकदार, उद्योजक, निर्यातदार तसेच विविध शासकीय यंत्रणांसोबत उद्योग क्षेत्राच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुंतवणूकदार व व्यावसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे, अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करणे, उद्योगांच्या विस्ताराला गती देणे तसेच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील उद्योजक, गुंतवणूकदार, निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच उद्योजकांनी या जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ......................................... हसन मुश्रीफ यांचा फोटो घेणे... चौकट पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम नंदुरबार : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. १०) सकाळी दहाला जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आढावा बैठक होणार आहे. बैठकीत पर्जन्यमान, पीक परिस्थिती, पिण्याचे पाणी, गणेशोत्सव याबाबत प्रशासनाच्या तयारीबाबत चर्चा होईल. जिल्हा क्रीडासंकुलातील प्रशासकीय कार्यालयाचे ऑनलाइन उद्‍घाटन या वेळी त्यांच्या हस्ते होईल. सायंकाळी पाचला शासकीय विश्रामगृह, तोरणमाळ (ता. धडगाव) येथे तोरणमाळ पर्यटन विकास आराखडा सादरीकरण बैठक होईल. त्यानंतर तहसील कार्यालय, तळोदा येथे तळोदा तालुका विविध शासकीय विभागाच्या विकास योजनांची आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT