नाशिक

धुळे दादासाहेब लेख

CD
धुळे ः जाहिरात टुडे १ फुल पेज, लेख, ॲंकर करणे - सूचना ः मा. संपादक सो. यांच्या परवानगीने लेख प्रसिध्दीस घ्यावा. - फोटो क्रमांक ः दादासाहेब रावल... - ...लीड... खानदेशच्या मातीने अनेक हिरे दिले, पण त्यातील सर्वात लखलखता हिरा म्हणजे दादासाहेब रावल. त्यांना कोणत्याही एका चौकटीत किंवा शब्दात बांधता येत नाही. स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, उद्योगपती, शेतकरी, शिक्षणतज्ज्ञ, सहकारमहर्षी, राजकारणी आणि दानशूर अशा तब्बल आठ वेगवेगळ्या भूमिका त्यांनी लीलया व समर्थपणे जगल्या. संस्थानिक घराण्यात जन्म होऊनही त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांचे हित जपले आणि खानदेशच्या विकासाचा पाया रचला. - प्राचार्य प्रशांत पाटील (मराठा विद्या प्रसारक समाजाचे राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक, नाशिक) --- खानदेशचे अष्टपैलू नेतृत्व, युगपुरूष दादासाहेब रावल --- प्राथमिक शिक्षण सोद्धारक शिक्षण संस्थेतून झाल्यानंतर दादासाहेब रावल यांनी अमळनेर येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी १९४२ च्या ऐतिहासिक ‘चले जाव’ चळवळीत त्यांनी उडी घेतली. इंग्रजांच्या बंदुकीसमोर उभे राहणे अशक्य असताना हा तरुण ‘इंग्रजांनो, भारत छोडो’ अशी गर्जना करत रस्त्यावर उतरला. त्यांनी तुरुंगवास भोगला, लाठ्या खाल्ल्या, पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते मागे हटले नाहीत. - देशासाठी धाडस पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतल्यानंतरही त्यांनी खानदेशचा विसर पडू दिला नाही. पुण्यात ‘खानदेश विद्यार्थी संघ’ स्थापन करून त्यांनी मुंबई-पुण्यात उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या खानदेशी विद्यार्थ्यांसाठी भक्कम आधार तयार केला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांचे ते पाईक होते. स्वातंत्र्यलढ्यात दोंडाईचाची गढी हीच क्रांतिकारकांचे आश्रयस्थान बनली होती. इंग्रज पोलिसांचा ससेमिरा असताना भूमिगत कार्यकर्त्यांना गढीत आश्रय, भोजन व आर्थिक मदत करण्याचे मोठे धाडस त्यांनी केले. - जिव्हाळ्याचा धागा स्वतंत्र भारताच्या १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले. आमदारकी आणि लोकप्रतिनिधी म्हणजे नेमके काय असते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. सारंगखेडा येथील तापी नदीवरील पूल हे त्यांचे सर्वात गाजलेले काम होय. हा पूल म्हणजे केवळ सिमेंट-लोखंडाचा सांगाडा नसून, दोन जिल्ह्यांना आणि दोन संस्कृतींना जोडणारा जिव्हाळ्याचा धागा ठरला. आजही लाखो शेतकरी, व्यापारी या पुलावरून ये-जा करतात. - शिक्षणमहर्षी पदवी खानदेशला शिक्षणाचे वरदान लाभले ते दादासाहेबांच्या शिक्षणप्रेमामुळेच. म्हणूनच जनतेने त्यांना ‘शिक्षणमहर्षी’ ही पदवी दिली. धुळे येथे १९५३ मध्ये खानदेशातील पहिले शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज सुरू केले. यातून आजवर हजारो अभियंते घडले असून, शासनाने या संस्थेस ‘दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन, धुळे’ असे नाव दिले आहे. मल्टीपर्पज हायस्कूल आणि मुलींसाठी १९५४ मध्ये स्वतंत्र गर्ल्स हायस्कूल सुरू केले. - दादासाहेबांचे ब्रीद ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ हे त्यांचे ब्रीद होते. धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी १९५८ मध्ये शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सहकाराचा पाया रचला. पांझरा- कान सहकारी साखर कारखाना, शिंदखेडा दूध संघ आणि कृषी औद्योगिक संघ या संस्था त्यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिल्या. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय दखल घेत १९८८ मध्ये उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते त्यांना दिल्लीत सन्मानित करण्यात आले. - उद्योगांतून रोजगार उद्योग म्हणजे केवळ मुंबई-पुणे नव्हे, तर ते ग्रामीण भागातही उभा राहू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले. १९७३ मध्ये युनिव्हर्सल स्टार्च (मक्यावर प्रक्रिया करणारा पहिला उद्योग), १९८३ मध्ये भारतातील पहिला लिक्विड ग्लुकोज प्रकल्प आणि १९८४ मध्ये युनिक शुगर्स उभारून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला व स्थलांतर रोखले. आज दोंडाईचा हे आधुनिक शहर म्हणून जे उभी आहे, त्याचे श्रेय दादासाहेबांच्या पाठपुराव्याला जाते. बाजार समिती, दूध संघ, महावितरण, न्यायालय आदी कार्यालये त्यांनी आणली. स्वतःच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जागा विनाशुल्क शाळा-महाविद्यालयांसाठी दान करून त्यांनी खऱ्या दानशूरतेचे दर्शन घडवले. त्यांना १९८६ ला नामांकित उद्योगपती रामकृष्ण बजाज यांच्या हस्ते ‘यशस्वी उद्योगपती’ पुरस्कार, तर १९९९ ला उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते विशेष राष्ट्रीय सन्मान प्रदान झाला. - प्रेरणादायी जीवन दादासाहेब रावल अत्यंत नीटनेटके, शिस्तप्रिय आणि आहाराबाबत सजग असत. माणसांची त्यांना विलक्षण पारख होती. स्वरूपसिंग नाईक यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपर्यंतचा प्रवास त्यांनी घडवला. ‘मोठा बंगला, मोठी गाडी यांपेक्षा मोठे कार्य करा, जेणेकरून लोक तुम्हाला कधीच विसरणार नाहीत,’ हा त्यांचा विचार आजच्या तरुण पिढीसाठी दीपस्तंभ ठरत आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT