नाशिक

जिल्ह्यात ४४३ पदविधर शिक्षकांना ‘पवित्र’ नियुक्ती

CD
फोटो : 29233 नाशिक : शिक्षक समुपदेशकाची प्रक्रिया राबविताना शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, महेश पाटील, मनोहर सूर्यवंशी आदी. -29234 नाशिक : शिक्षक म्हणून शाळा निश्‍चित झाल्यानंतर जिल्ह्याचा नकाशा बघताना नवनियुक्त शिक्षक व पालक. ... रिक्त शाळांना मिळाले ४४३ शिक्षक पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त्या; आज आणखी ३४२ उपशिक्षकांचे समुपदेशन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे पात्र ठरलेल्या ४४३ पदवीधर शिक्षकांना बुधवारी समुपदेशनातून नियुक्ती देण्यात आली. यामुळे मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला, कळवण आदी तालुक्यांमध्ये अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदवीधर शिक्षकांच्या जागांचा ‘बॅकलॉग’ मोठ्या प्रमाणात भरून निघाला आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. नाशिक जिल्हा परिषदेत पदवीधर व उपशिक्षकांच्या मिळून ९९९ जागा रिक्त आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या उपस्थितीत समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. नवनियुक्त शिक्षकांना तालुक्यातील शाळा निवडण्याची संधी देण्यात आली. मात्र, रिक्त जागा प्रामुख्याने दुर्गम व दूरच्या तालुक्यांमध्ये असल्याने अनेकांना मर्यादित पर्याय उपलब्ध झाले. तरीही नाशिक जिल्ह्यात शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अनेक उमेदवार आई-वडील, पती किंवा पत्नीसह जिल्हा परिषदेत उपस्थित राहिल्याने दिवसभर परिसरात उत्साहाचे वातावरण होते. नियुक्त झालेल्या शिक्षकांमध्ये गणित व विज्ञान विषयाचे २३६, भाषा विषयाचे २०७ तसेच उर्दू माध्यमातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. यावेळी उपशिक्षणाधिकारी मनोहर सूर्यवंशी, प्रशासन अधिकारी महेंद्र पवार, गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याला ७८५ नवीन शिक्षक मिळणार पदवीधर शिक्षकांनंतर गुरुवारी ३४२ उपशिक्षकांना समुपदेशनातून नियुक्ती दिली जाणार आहे. त्यामुळे दोन दिवसांत जिल्ह्याला एकूण ७८५ नवीन शिक्षक मिळणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित रिक्त जागा भरण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे. पदवीधर व उपशिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येत आहे. अनेक महिन्यांपासून शिक्षकांविना असलेल्या शाळांना आता शिक्षक मिळणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सकारात्मक बदल दिसेल. - साईलता सामलेटी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प. नाशिक शिक्षण विभागाने अत्यंत चांगली प्रक्रिया राबविली. कळवणच्या आदिवासी भागातील शाळेत नियुक्ती मिळाल्याचा आनंद आहे. विद्यार्थ्यांना शिकवितानाच ‘एमपीएससी’चा अभ्यासही सुरू ठेवणार आहे. - तेजस बोंदरे, नवनियुक्त शिक्षक

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT