नाशिक

गोंदुणेची ग्रामसभा सलग साडेतेरा तास

CD
विकासकामांच्या हिशोबावरून ग्रामसभा तब्बल साडेतेरा तास! गोंदुणे ग्रामस्थांचा खर्चाचा तपशील व कागदपत्रांसाठी आग्रह सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : ग्रामपंचायतीने गेल्या चार वर्षांत केलेल्या विकासकामांचा आणि त्यावरील खर्चाचा सविस्तर हिशोब मागण्याच्या मुद्द्यावर सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे गावातील ग्रामसभा तब्बल साडेतेरा तास चालली. मात्र, एवढ्या प्रदीर्घ चर्चेनंतरही ग्रामस्थांना समाधानकारक माहिती न मिळाल्याने हा प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही. गोंदुणे येथे २५ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी सन २०२२ पासून आजपर्यंत गावात करण्यात आलेल्या सर्व विकासकामांचा तसेच त्यावरील खर्चाचा सविस्तर हिशोब मागितला होता. यासंदर्भातील माहिती सादर करण्यासाठी ग्रामपंचायतीने ८ सप्टेंबरपर्यंत मुदत मागितली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली ग्रामसभा रात्री ११.३० वाजेपर्यंत चालली. गेल्या चार वर्षांतील विकासकामे, त्यासाठी झालेला खर्च आणि संबंधित कागदपत्रांचा तपशील हा ग्रामसभेतील चर्चेचा मुख्य व सर्वाधिक वेळ चाललेला विषय ठरला. ग्रामस्थांनी प्रत्येक कामाचा स्वतंत्र तपशील, खर्चाची माहिती आणि त्यासंबंधीची कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी लावून धरली. मात्र, दिवसभर चाललेल्या चर्चेनंतरही अपेक्षित व समाधानकारक माहिती मिळू शकली नाही. बुधवारी आवश्यक माहिती देण्यात येईल, असे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. तरीही ग्रामस्थांच्या हाती स्पष्ट माहिती न लागल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामपंचायतीला सन २०२२ पासून आजपर्यंतच्या सर्व विकासकामांचा संपूर्ण हिशोब तसेच संबंधित कागदपत्रे तातडीने सार्वजनिक करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT