नाशिक

तीन दिवस कोठडी

CD
धुळे : टुडे पान ३ साठी... -- लाचप्रकरणी संशयितांना तीन दिवसांची कोठडी -- अवैध वाळूचे वाहन सोडण्याचे प्रकरण सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ९ : हायवा वाहनावरील दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोन तलाठ्यांसह एका खासगी व्यक्तीला जिल्हा न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. ८) सापळा रचून ही कारवाई केली होती. साक्री रोडवरील मोती नाल्याजवळ तक्रारदाराचे हायवा वाहन रोखून अवैध वाळू वाहतुकीची कारवाई न करण्यासाठी धुळे शहर तहसील कार्यालयातील तलाठी दिनेश दिलवर दाभाडे (वय ४०, रा. मोहाडी, अतिरिक्त कार्यभार फागणे), तलाठी मृणाल शरद नगराळे (बाळापूर) आणि तलाठी गायकवाड याने वाहनचालकाचा मोबाईल काढून घेतला होता. तसेच २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने आधी आठ हजार रुपये दिले. मात्र उर्वरित १२ हजार रुपये देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार केली. पडताळणीनंतर सापळा रचून संशयित खासगी व्यक्ती जयेश कैलास चौधरी (वय ३१) याच्यामार्फत लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी दाभाडे याला पकडण्यात आले. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार तलाठी नगराळे याला बुधवारी (ता. ९) सकाळी ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : बालासोरच्या जंगलातून सुखरूप वाचवण्यात आलेल्या पाच ओरंगुटानच्या पिल्लांना भुवनेश्वरमधील नंदनकानन प्राणीसंग्रहालयात

SCROLL FOR NEXT