नाशिक

जिल्हा क्रीडा संकुलातील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

CD
फोटो : 29265 नंदुरबार : क्रीडासंकुलात साकारण्यात आलेली प्रशासकीय इमारत. ------------------------ जिल्हा क्रीडासंकुल प्रशासकीय इमारतीचे उद्‍घाटन नंदुरबार, ता. १० : येथील जिल्हा क्रीडासंकुलासाठी शासनाकडून प्राप्त १५ कोटींच्या निधीतून विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. या अंतर्गत प्रशासकीय इमारतीचे उद्‍घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झाले. जिल्ह्यातील खेळाडूंना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना त्यांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी आदी उपस्थित होते. या इमारतीमुळे संकुलातील प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रशासकीय इमारतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बैठक सभागृह तसेच बहुउद्देशीय सभागृहाच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सध्या खेळाडूंसाठी तळमजला व तीन मजल्यांचे वसतिगृह उभारण्याचे काम सुरू आहे. वसतिगृहात २०० खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था उपलब्ध आहे. बॅडमिंटन हॉल, जुने वसतिगृह तसेच शूटिंग रेंजची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. क्रीडासंकुलातील मातीच्या ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामही सुरू आहे. इमारतीमुळे प्रशासकीय कामकाजासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी दिली.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT