नाशिक

रायसोनी करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन

CD
रायसोनी करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन उपशीर्षक २४ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : रायसोनी इन्स्टिट्यूटतर्फे जी. एच. रायसोनी करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी जळगाव येथे तर अंतिम फेरी नागपूर येथे पार पडणार आहे. रायसोनी महाविद्यालय, जळगाव येथे या स्पर्धेची प्राथमिक फेरी होईल. प्राथमिक फेरीत अव्वल ठरणाऱ्या तीन एकांकिकांना अंतिम फेरीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. अंतिम फेरी १ ते ४ फेब्रुवारी २०२७ दरम्यान नागपूर येथे रंगणार आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी १ लाख ११ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ७१ हजार, तृतीय क्रमांकासाठी ५१ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम व द्वितीय उत्तेजनार्थ संघांना प्रत्येकी २१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनय, दिग्दर्शन, प्रकाशयोजना, रंगभूषा व वेशभूषा, नेपथ्य, संगीत, लेखन आदी विविध वैयक्तिक व विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत. या सर्व पुरस्कारांची एकूण रक्कम तब्बल ३ लाख ८१ हजार इतकी आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयांना ११०० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागणार असून, नोंदणीची अंतिम तारीख २४ सप्टेंबर आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT