नाशिक

चाकूचा धाक दाखवून ‘सीए’ला लुटले

CD
चाकूचा धाक दाखवून ‘सीए’ला लुटले सराईत समीर पठाणसह महिलेविरोधात गुन्हा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : पैसे परत मागितल्याच्या रागातून एका सीएला खोटी तक्रार करण्याची धमकी देत, चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांची वसुली करणाऱ्या एका महिलेसह सराईत गुन्हेगार साथीदाराविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाया जयप्रकाश सेन (रा. नरहरी नगर, पाथर्डी फाटा, नाशिक), टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाण अशी संशयितांची नावे आहेत. चार्टर्ड अकाउंटंट व्यावसायिक राजेश सत्यनारायण चांद यांच्या फिर्यादीनुसार, संशयित छाया सेन हिने २०१९ पासून वेळोवेळी त्यांच्याकडून एकूण ९ लाख ९७ हजार रुपये घेतले होते. हे पैसे परत न करता तिने चांद यांची आर्थिक फसवणूक केली. चांद यांनी आपल्या हक्काचे पैसे परत मागितले असता, संशयित महिलेने कुख्यात टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार समीर पठाण याच्याशी संगनमत केले. संशयित पठाण याने सीए चांद यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी देत त्यांच्यावर दबाव आणला. तसेच, चाकूचा धाक दाखवून, मारहाण व शिवीगाळ करत त्यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी उकळली. तसेच बुधवारी (ता. ९ सप्टेंबर) दुपारी २ ते ३ च्या सुमारास छाया सेन आणि समीर पठाण या दोघांनी राजेश चांद यांच्या कार्यालयात प्रवेश केला. समीर पठाण याने चांद यांना पुन्हा मारहाण करून दुसऱ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आणि ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करीत पुन्हा एक लाख रुपये जबरदस्तीने उकळले. ---------- ​समीर पठाणवर २२ गंभीर गुन्हे शहरातील टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार समीर पठाण त्याच्याविरुद्ध नाशिक शहर आणि परिसरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, हद्दपारीचा आदेश मोडून शहरात फिरणे आणि आर्म ॲक्टअंतर्गत २२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

Hartalika Katha: हरतालिकेची कहाणी! हवा तसा नवरा मिळावा म्हणून महिला का करतात व्रत! माता पार्वती-भगवान शंकरांची संपूर्ण कथा वाचा इथेच

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Kannad News : माझ्यावर जी वेळ आली ती कोणावरही येऊ नये! एकीकडे मुलगा मृत, दुसरीकडे पती आयसीयूत; मुलगीही रुग्णालयात उपचाराधीन

Hadapsar Fire Incident: हडपसर माळवाडीतील विहार कॉलनीत भीषण आग; आठ पत्र्यांची घरे जळून खाक, सिलेंडर स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT