मेन फिचर
NSK26H29319
जळगाव : विर्सजन मार्गावरील खड्डे बुजविताना मक्तेदाराचे कर्मचारी. कामाची पाहणी करताना अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, शहर अभियंता योगेश बोरोले.
----
NSK26H29270
जळगाव : विर्सजन मार्गावरील अडसर ठरणाऱ्या फांद्या तोडताना महापालिकेचे कर्मचारी.
---
गणरायाच्या मिरवणुकीचा मार्ग सुकर
९० टक्के खड्डे बुजविले; उंच गणेशमूर्तींसाठी अडथळे दूर करण्याचे काम वेगात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका सुरक्षित आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी महापालिकेने विसर्जन मार्गांच्या तयारीला वेग दिला आहे. मिरवणूक मार्गातील सुमारे ९० टक्के खड्डे बुजविण्यात आले असल्याची माहिती आयुक्त आदित्य जिवने यांनी दिली. तसेच उंच गणेशमूर्ती, सजावटीचे रथ तसेच मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मार्गावरील धोकादायक आणि लोंबकळलेल्या फांद्यांची छाटणी करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केलेले आहे.
गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघतात. या मिरवणुकांमध्ये मोठ्या आकाराच्या आणि उंच मूर्ती नेल्या जात असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या अनेकदा अडथळा ठरतात. काही ठिकाणी लोंबकळलेल्या किंवा कमकुवत फांद्यांमुळे नागरिक तसेच मिरवणुकीतील कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतली. ही मोहीम महापालिकेच्या विद्युत, अग्निशमन, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे राबविली. संबंधित विभागांच्या पथकांनी मार्गांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी कार्यवाही केली.
कामांना वेग
गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. त्यात गणेशोत्सव जवळ आल्याने महापालिका प्रशासनाने विर्सजन मार्ग तसेच शहरातील मुख्य मार्गावरून जाणाऱ्या गणपती मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग दिला आहे. तसेच तीन ते चार प्रभागात खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले नव्हते, त्या मक्तेदारांना देखील आयुक्तांनी नोटीस बजावत कामांना त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहे.
समतोल राखत छाटणी
महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कार्यवाहीत अनावश्यक वृक्षतोड टाळण्यावर भर देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीस अडथळा ठरणाऱ्या, धोकादायक किंवा खाली लोंबलेल्या फांद्यांचीच गरजेनुसार छाटणी करण्यात आली.
चौकट
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा
दरम्यान, गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळांनाही पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून वृक्षारोपण करून केवळ लागवड न करता त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित विसर्जनासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उत्सव साजरा करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
कोट..
शहरात यंदा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व उत्साहात साजरा करण्यासाठी व महापालिका प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. विर्सजन मार्गावरील ९० टक्के खड्डे बुजविले असून, उर्वरित कामे लवकरच केले जातील. तसेच मेहरुण तलाव येथील विर्सजन ठिकाणीची तयारी देखील सुरू आहे.
- आदित्य जिवने, आयुक्त. महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.