नाशिक

सुवर्णकार बांधवांतर्फे बागेश्री पूजन उत्साहात परंपरा जपण्यासह समाजाच्या एकजुटीचा दिला संदेश

CD
NSK26H29271 जळगाव : बागेश्री पूजन करताना सुवर्णकार कारागीर. --- सुवर्णकार बांधवांतर्फे बागेश्री पूजन उत्साहात परंपरा जपण्यासह एकजुटीचा संदेश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : सुवर्णकार समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत सुवर्णकार बांधवांतर्फे बागेश्री पूजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या पूजनासाठी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधिवत पूजा-अर्चा करून बागेश्री देवीला नैवेद्य अर्पण करण्यात आला. सुवर्णकार समाजाच्या दृष्टीने बागेश्री पूजनाला धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. समाजाच्या पारंपरिक व्यवसायाशी निगडित श्रद्धा, रूढी आणि प्रथा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याबरोबरच समाजबांधवांमध्ये एकोपा आणि बंधुभाव वाढविणे, हा या पूजनामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. पूजनाच्या निमित्ताने समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक विधी पार पडल्यानंतर सामूहिक आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामुळे सुवर्णकार समाजातील पारंपरिक संस्कृती, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचे दर्शन घडले. बदलत्या काळातही आपल्या पूर्वजांनी जपलेल्या परंपरांचे संवर्धन करणे आणि त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. बागेश्री पूजनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र आले. त्यामुळे सामाजिक सलोखा, परस्पर सहकार्य आणि एकजुटीला बळ मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT