नाशिक

सरपंचपद आरक्षण जाहीर

CD
धुळे : टुडे पान ३ साठी... अँकर -- साक्रीतील ६८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण जाहीर -- स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; कार्यक्रमाकडे लक्ष सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. १० : तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिगर अनुसूचित क्षेत्रातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे २०२५- २०३० या कालावधीसाठीचे प्रवर्गनिहाय आरक्षण मंगळवारी (ता. ८) निश्चित करण्यात आले. तहसील कार्यालयात तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या अध्यक्षतेत आरक्षणाची सोडत पार पडली. आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवार आणि स्थानिक राजकीय गटांच्या हालचालींना वेग आला आहे. - प्रांताधिकारी रोहन कुवर, अपर तहसीलदार अधिकार पेंढारकर आणि नायब तहसीलदार किरण कोठावदे उपस्थित होते. ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार सरपंचपदांचे आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण अशा चार प्रवर्गांमध्ये निश्चित करण्यात आले. या आरक्षण सोडतीकडे ग्रामस्थांसह विद्यमान व माजी ग्रामपंचायत सदस्य, संभाव्य उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते. आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्याने अनेक गावांतील इच्छुकांच्या राजकीय हालचालींना आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. - प्रवर्गनिहाय आरक्षणाचे चित्र या आरक्षण प्रक्रियेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी लोणखेडी, कळंभीर आणि वसमार या तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण निश्चित झाले आहे. तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी अष्टाणे, कोकले, आयणे (मळखेडे), मलांजन, निळगव्हाण, म्हसदी (प्र. नेर), नागपूर (व), नाडसे, शेणपूर, अक्कलपाडा, बळसाणे आणि विटाई या १२ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. तसेच, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी कासारे, भडगाव (व), तामसवाडी, धाडणे, गणेशपूर, हट्टी (बुद्रूक)/घाणेगाव, नांदवण/कोकले, चिंचखेडे, फोफादे, निजामपूर, वाजदरे, अंबापूर, छडवेल (प.), ऐंचाळे, बेहेड, दुसाणे, काळगाव आणि सैयदनगर/इच्छापूर या १८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय भामेर, खोरी, प्रतापपूर, भाडणे/गोंदास, उभंड, उंभर्टी, नवडणे/सायणे, फोफरे, म्हसाळे, इंदवे, भागापूर, सातरपाडा, दातर्ती/गंगापूर, दिघावे, कावठे, वर्धाणे, हट्टी (खु.), वेहेरगाव/रोजगाव, ककाणी/भडगाव, आखाडे, महिर, शेवाळी मा., उभरांडी/होडदाणे, छाईल, शेवाळी दा., कढरे, जैताणे, खुडाणे, मालपूर, धमणार, जामदे, उंभरे, छावडी/आमोदे, दारखेल आणि सतमाने या ३५ ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. - निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष आरक्षण निश्चित झाल्याने आगामी निवडणुकीसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दरम्यान कोणत्या गावात कोणता उमेदवार पुढे येणार, कोणत्या गटाला कोणाचा पाठिंबा मिळणार आणि पॅनेलची बांधणी कशी होणार, याबाबत गावागावांत चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT