मेन फिचर पान २
--
NSK26H29276
जळगाव : महात्मा फुले मार्केटमध्ये गाळेधारकांना अतिक्रमण हटविण्याच्या सूचना देताना महापालिकेचे कर्मचारी.
---
फुले संकुलातील अतिक्रमण हटविण्याच्या सूचना
मनपा पथकाकडून स्वच्छतेबाबत जनजागृती; ओटे, शेड काढण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १० : महात्मा फुले मार्केट परिसरातील गाळेधारकांनी दुकानांसमोरील अतिक्रमणे स्वतःहून हटवावीत, तसेच मार्केट परिसरात स्वच्छता राखावी, याबाबत महापालिकेच्या मार्केट वसुली विभागाच्या पथकाने गाळेधारकांमध्ये जनजागृती केली. दुकानांसमोरील वाढीव ओटे, पत्री शेड, जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर आदींमुळे सार्वजनिक जागेत अडथळे निर्माण होत असल्याने ते काढून घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी ५ सप्टेंबरला फुले मार्केट परिसराची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान काही गाळेधारकांनी दुकानांसमोरील जागेत विविध प्रकारचे अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर मार्केट वसुली विभागाच्या पथकाने परिसरातील गाळेधारकांशी संवाद साधून अतिक्रमणे काढून घेण्याबाबत सूचना केल्या. दुकानांसमोरील जागा मोकळी ठेवावी, पत्री शेड, वाढीव ओटे, जाहिरात फलक किंवा इतर विनापरवानगी बांधकाम करू नये, असे गाळेधारकांना सांगण्यात आले. यामुळे ग्राहकांची ये-जा, पॅसेज तसेच सार्वजनिक वापराच्या जागेत अडथळे निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
स्वच्छतेबाबतही जनजागृती
मार्केट परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक गाळेधारकाने आपल्या दुकानासमोर कचरापेटी ठेवावी आणि त्यामध्येच कचरा जमा करावा, अशा सूचना देण्यात आल्या. रस्त्यावर, पॅसेजमध्ये किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, याबाबतही गाळेधारकांना माहिती देण्यात आली. या सूचना फलकांद्वारे तसेच ध्वनिक्षेपकावरूनही देण्यात आल्या.
चौकट
गाळेधारकांनी घातला वाद
दरम्यान, काही गाळेधारकांनी मार्केट परिसरातील पथविक्रेत्यांच्या अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करून वाद घातला. याबाबतही प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही केली जात असल्याचे सांगण्यात आले. मार्केटमधील स्वच्छता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सोयीसाठी गाळेधारकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.