धुळे : टुडे पान ३ साठी...
--
फोटो क्रमांक : 29278
बळसाणे (ता. साक्री) : लुपिन फाऊंडेशनसह विविध विभागांच्या समन्वयाने झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर. शेजारी विद्यार्थी, ग्रामस्थ आदी.
--
लुपिन फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पोषण सप्ताह उत्साहात
--
बळसाणे येथे जनजागृतीपर उपक्रम; विविध विषयांवर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १० : बळसाणे (ता. साक्री) गावात लुपिन ह्युमन वेल्फेअर ॲन्ड रिसर्च फाउंडेशनअंतर्गत बेटर कॉटन प्रकल्प, कृषी आधारित उपजीविका सक्षमीकरण कार्यक्रम, सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विकास विभाग आणि जिल्हा परिषद मराठी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. एक ते सात सप्टेंबर या कालावधीत विविध जनजागृतीपर उपक्रमांद्वारे हा सोहळा पार पडला.
-
कार्यक्रमास प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाणे, जिल्हा समन्वयक निलेश पवार, जिल्हा समन्वयक प्रियंका तेलंगे, जिल्हा व्यवस्थापक जेंडर लीड जितेंद्र गायकवाड, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक कुमार पानझडे, अंबादास चाळगे, पी.यू. व्यवस्थापक प्रशांत देसले, कृषीतज्ञ भोपळे, पशुधनतज्ञ जगदीश राजपूत आणि भूषण ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी लुपिन फाउंडेशनच्या प्रियंका तेलंगे यांनी गर्भवती माता, स्तनदा माता व बालकांना संतुलित आहार, पोषणाचे महत्त्व आणि आरोग्यदायी आहाराच्या सवयींबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर अंगणवाडी सेविका सुचिता गिरासे व कविता खांडेकर यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजना, लसीकरण व उपचाराची माहिती दिली. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार, फळभाज्या व फळे या विषयांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. आशासेविका सुचिता गिरासे, जया धनगर, मंदाबाई, रेखा, संगीता, सुमया, वंदना, भारती, शारदा, माधुरी आणि मेघा यांनी सहभाग घेतला. गर्भवती व स्तनदा मातांना शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडूचे पाकीट आणि केळीचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच, अंगणवाडीतील मुलांनाही चिक्की देण्यात आली. अनिश शाह आणि किशोर काकुस्ते यांनी सूत्रसंचालन केले. धीरज नरोटे आणि भालचंद्र भामरे यांनी आभार मानले. प्रशांत देसले, शरद भोपळे, जगदीश राजपूत, धीरज नरोटे व भालचंद्र भामरे यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.