नाशिक

के.आर.पब्लिक स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती उपक्रम

CD
(कृपया आवश्‍यक घ्यावी) मस्ट फोटो : 29289 नंदुरबार : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करताना विद्यार्थिनी. ----------------------- के. आर. पब्लिक स्कूलमध्ये पयार्वरणपूरक गणेशमूर्ती उपक्रम नंदुरबार, ता. १० : येथील के. आर. पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी श्री गणेशमूर्ती निर्मितीचा प्रेरणादायी उपक्रम राबविला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० अंतर्गत कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात ५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी कलात्मकतेने गणेशमूर्ती तयार केल्या. या सर्व मूर्ती पर्यावरणपूरक असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कौशल्य शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून विविध कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळत असते. संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणींचे विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन मिळत असते. सिद्धार्थ वाणी यांच्या परिश्रमातून हा उपक्रम साकारला जात आहे. प्राचार्या छाया शर्मा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांनी कौशल्याधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शाळेचा प्रयत्न असल्याचे सांगितले. कलेतून कौशल्य, कौशल्यातून आत्मविश्वास आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्तींतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश’ देणारा शाळेचा हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT