NSK26H29290
जळगाव : रायसोनी महाविद्यालयात शिक्षक दिनाच्या औचित्याने विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला, त्याप्रसंगी प्रा.डॉ. सुहास गाजरे, प्रा.डॉ. प्रीती अग्रवाल आदी.
--------
रायसोनी महाविद्यालयात
शिक्षक दिन सोहळा
उपशिर्षक
२३ प्राध्यापकांच्या योगदानाचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१० : ज्ञानदानातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करून सक्षम पिढी घडविणाऱ्या प्राध्यापकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रायसोनी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २३ प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास गाजरे आणि अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरपर्सन निशा जैन उपस्थित होत्या.
------
(चौकट)
यांचा झाला गौरव
यावेळी महाविद्यालयाच्या विविध विभागांमध्ये आणि विविध शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रा. डॉ. मुकुंद पाटील, प्रा. डॉ. स्वाती पाटील, प्रा. रफिक शेख, प्रा. डॉ. सौरभ नाईक, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. तन्मय भाले, प्रा. अमोल जोशी, प्रा. वसीम पटेल, प्रा. श्रिया कोगटा, अतुल महाजन, रजिस्टार डॉ. अरुण पाटील, गौरव तिवारी, प्रा. डॉ. शांतनु पवार, प्रा. डॉ. तुषार पाटील, प्रा. करिश्मा चौधरी, प्रा. योगेश वंजारी, क्रीडा संचालक श्री. सागर सोनवणे, प्रा. डॉ. ज्योती जाखेटे, प्रा. डॉ. बिपासा पात्रा, प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा. डॉ. जितेंद्र वडदकर आणि श्रीमती नीलिमा चौधरी यांचा गौरव करण्यात आला.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.