नाशिक

गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी परिश्रम घ्यावेत : नमन गोयल

CD
मस्ट फोटो : 29296 नंदुरबार : पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी नमन गोयल, चंद्रकांत पवार, गणेश मोरे, क्रांती आरसूड, डॉ. दीपक साबळे, डॉ. रमेश चौधरी, वंदना वळवी व पुरस्कारप्राप्त शिक्षक. ----------------------- शिक्षकांनी समर्पित वृत्तीने काम करावे नमन गोयल ः जिल्ह्यातील सहा शिक्षकांना पुरस्कार नंदुरबार, ता. १० : जिल्ह्यातील शाळांमध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी समर्पित वृत्तीने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले. जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात झालेल्या जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. या वेळी जिल्ह्यातील सहा गुणवंत शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देण्यात आला. गेल्या वर्षी राज्य पुरस्कार मिळवणाऱ्या शिक्षकांचाही या वेळी गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये सोनाली बोरसे (जि. प. शाळा, कोठली, ता. नंदुरबार), भरत साबळे (जि. प. शाळा, वावडी, ता. नवापूर), तुकाराम अलट (जि. प. शाळा, काथर्दे खु. ता. शहादा), दिलीप पावरा (जि. प. शाळा, कोठार ता. तळोदा), जितेंद्रसिंग वळवी (जि. प. शाळा, अक्कलकुवा ता. अक्कलकुवा), सुनील चित्ते (जि.प. शाळा, जुने धडगाव ता. धडगाव) यांचा समावेश आहे. राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक विशाल पाटील, बालकिसन ठोंबरे, ज्ञानेश्वर बोरसे, सुषमा शहा यांचाही या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. पंकज पटले यांनी आपण गोंदिया येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी होतो आणि वडीलही जि.प. शिक्षक होते, असे सांगून शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी क्रांती आरसूड, प्राचार्य डॉ. दीपक साबळे, अधिव्याख्याता डॉ. रमेश चौधरी, उपशिक्षणाधिकारी वंदना वळवी व रोहिणी नांद्रे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT