नाशिक

​गंगापूर रोडवर सव्वा तीन लाखांचे ‘एमडी’ जप्त

CD
​गंगापूर रोडवर सव्वातीन लाखांचे ‘एमडी’ जप्त गंगापूर पोलिसांची कारवाई : तिघांवर गुन्हा दाखल ​सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : शहरात अमली पदार्थांची बेकायदा विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, गंगापूर परिसरातील गोवर्धन ते कानेटकर गार्डन रस्त्यावर छापा टाकून तब्बल तीन लाख ३५ हजार ८८० रुपयांचा ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक केली आहे. अनिकेत बाळू गांगुर्डे (वय २५, रा. राजवाडा, गंगापूर गाव), सागर काशीनाथ गांगुर्डे (३२, रा. सावन रो-हाउस, शिवाजीनगर, कार्बन नाका), राहुल खंडारे (२६, रा. ध्रुवनगर, नाशिक) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. गंगापूर पोलिसांनी बुधवारी (ता. ९) रात्री ही कारवाई केली. गोवर्धनकडून कानेटकर गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीटलाइटसमोर काही तरुण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. या कारवाईदरम्यान मोपेडवर (एमएच १५, जीएम ०२७७) आलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता अनिकेत बाळू गांगुर्डे याच्याकडून दोन लाख २७ हजार ५८० रुपये किमतीचे ७५.८६० ग्रॅम ‘एमडी’ आणि सागर काशीनाथ गांगुर्डे याच्याकडून ६८ हजार १०० रुपये किमतीचे २२.७०० ग्रॅम ‘एमडी’ जप्त करण्यात आले. तसेच संशयितांकडून दोन महागडे स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि मोपेड असा एकूण तीन लाख ३५ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खंडारेकडून आणले ड्रग्ज संशयितांची अधिक चौकशी केली असता, हा एमडी ड्रग्जचा साठा त्यांनी विक्रीसाठी राहुल खंडारे (२६, रा. ध्रुवनगर, नाशिक) याच्याकडून आणल्याची कबुली पंचांसमक्ष दिली. या प्रकरणी पोलिस शिपाई प्रशांत देशमुख (२८, रा. म्हसरूळ) यांनी फिर्यादीवरून संशयित तिघांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक श्रीराम पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT