नाशिक

खासदार स्मिता वाघ यांना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

CD
NSK26H29297 नवी दिल्ली : संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सलग दुसऱ्या वर्षी खासदार स्मिता वाघ यांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्याप्रसंगी उपस्थित माजी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आदी. --------- खासदार स्मिता वाघ यांना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’ उपशीर्षक जनतेच्या विश्वासाला मानाची पावती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांना प्रतिष्ठेचा ‘संसदरत्न पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांना सलग दुसऱ्या वर्षी मिळाला आहे. संसदेतील प्रभावी उपस्थिती, जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडणे आणि लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन व विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संसदरत्न पुरस्कार समिती, ज्युरी सदस्य, संसदीय सहकारी, भाजप परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते, सहकारी आणि शुभेच्छुकांचेही त्यांनी आभार मानले. ---- कोट मागील वर्षी मिळालेल्या पहिल्या ‘संसदरत्न’ सन्मानाने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा दिली. सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या पुरस्कारामुळे जनतेप्रति असलेली जबाबदारी आणखी वाढली आहे. -स्मिता वाघ, खासदार, जळगाव

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT