29301
नंदूरबार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देताना कंत्राटदार.
--------------------------
बिले थकल्याने कंत्राटदार आर्थिक संकटात
देयके तातडीने अदा करण्याची संघटनेची पालकमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ११ : जिल्ह्यात आदिवासी विकास विभागांतर्गत पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची बिले दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे कंत्राटदार वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रलंबित देयकांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कंत्राटदारांनी दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या देयकांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीची माहिती पालकमंत्री व जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्यासमोर मांडली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर देयके प्रलंबित असून, नंदुरबार जिल्ह्यातही मोठ्या रकमेची बिले रखडली आहेत. आदिवासी विकास विभागाच्या विविध लेखाशीर्षांतर्गत मोठ्या प्रमाणावर विकासकामांना मंजुरी देण्यात आली होती. कंत्राटदारांनी स्वतःचे भांडवल गुंतवून तसेच बँकांकडून कर्ज घेऊन विकासकामे पूर्ण केली. अनेक कामे निर्धारित मुदतीपूर्वी पूर्ण करून संबंधित विभागाकडे देयके सादर करण्यात आली. मात्र, कामे पूर्ण होऊनही देयकांचा निधी वेळेत उपलब्ध न झाल्याने कंत्राटदारांची आर्थिक कोंडी झाली आहे.
निविदा प्रक्रियेत आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीसाठी अनेक कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. मात्र, बिले रखडल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. प्रलंबित निधीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी लेखी निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. कंत्राटदारांच्या अडचणी मांडण्यात आल्या. मात्र, निधी उपलब्धतेबाबत अद्याप अपेक्षित तोडगा निघालेला नसल्याची खंत असोसिएशनने व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.