नाशिक

नाशिकच्या ‘सीपीआरआय’मध्ये ईव्ही तपासणी करा

CD
नाशिकच्या ‘सीपीआरआय’मध्ये ईव्ही तपासणी करा मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय ऊर्जामंत्री खट्टर यांच्याकडे मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : जिल्ह्यातील शिलापूर येथील सेंट्रल पॉवर रिसर्च इन्सिट्यूटच्या (सीपीआरआय) परिसरात अत्याधुनिक ईव्ही तपासणी केंद्र स्थापन करण्याची मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मंत्री भुजबळ यांनी म्हटले, की नाशिकला प्रमुख औद्योगिक, इलेक्ट्रिकल आणि ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल तसेच ऑटोमोबाईल घटक निर्मिती उद्योगांचा भक्कम पाया आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ, तांत्रिक शिक्षण संस्था, औद्योगिक परिसंस्था आणि उत्तम दळणवळणाच्या सुविधा लक्षात घेता, इलेक्ट्रिक व्हेइकल क्षेत्राच्या विकासासाठी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात क्षमता उपलब्ध आहे. सीपीआरआय केंद्राचे उद्‍घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले आहे. त्यामुळे सीपीआरआय नाशिकच्या विद्यमान पायाभूत सुविधा आणि परिसराचा विस्तार करून त्याचा उपयोग नव्या व उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी करणे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. नाशिकच्या उद्योगांना मिळणार ‘बूस्ट’ देशात ईव्हीचा वापर तसेच त्यांची निर्मिती वेगाने वाढत आहे. त्यामुळे ईव्हीएस, बॅटरी, चार्जिंग सिस्टिम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर ईव्ही साहित्य यांच्या टेस्टिंग, व्हॅलीडेटिंग आणि प्रमाणपत्रासाठी अत्याधुनिक व विश्वासार्ह सुविधांची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन नाशिकमधील सीपीआरआय केंद्रात स्वतंत्र ईव्ही तपासणी केंद्र उभारल्यास उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. प्रकल्पाचे संभाव्य फायदे -महाराष्ट्रातील ईव्ही उत्पादक, ऑटोमोबाईल उत्पादकांना स्थानिक पातळीवर टेस्टिंग व प्रमाणपत्र सुविधा -उत्पादकांचा वेळ व खर्च कमी होण्यास मदत -इलेक्ट्रिक मोबॅलिटी क्षेत्रातील संशोधन आणि विकास, नवउत्पादकता आणि तंत्रज्ञान प्रमाणपत्र यांना चालना -ईव्ही, बॅटरी टेक्नॉलॉजी, चार्जिंग साहित्य, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या क्षेत्रांत संधी -देशभरातील ईव्ही मॅन्युफॅक्चर्स आणि कम्पोनंट मॅन्युफॅक्चर्स यांना नाशिककडे आकर्षित करण्यास मदत -राष्ट्रीय स्तरावरील सेंटर ऑफ एक्सलन्स विकसित करण्याची संधी

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT