नाशिक

स्थायी समिती सभा

CD
धुळे टुडे २ साठी मेन... --- फोटो- NSK26H29300 धुळे : महापालिकेच्या स्थायी समिती सभेला उपस्थित सभापती लताबाई पोतदार, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, नगरसचिव मनोज वाघ. --- मनपा सत्ताधाऱ्यांकडून बॅनरबाजीला ‘सुट’ --- स्थायी समिती सभा; मनुष्यबळासाठी सहा निविदाधारकांचे समान दर, विषय तहकुब --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १० : महापालिकेतील विविध संवर्गातील पदांसाठीचे मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी तत्वावर घेण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या. या प्रक्रीयेत सातपैकी तब्बल सहा निविदाधारकांचे न्यूनतम दर (एल- १) सारखेच प्राप्त झाले. त्यामुळे या सहाही निविदाधारकांना समप्रमाणात काम देण्याचा निर्णय प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, स्थायी समिती सभेत या निर्णयावर प्रश्न उभे राहिल्याने विषय तहकुब करण्यात आला. दुसरीकडे बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याची ओरड होत असतांना बॅनरचे दर कमी करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला सत्ताधारी सदस्यांनी समंती दिली. शिवसेना सदस्याने मात्र यात मनपाचे आर्थिक नुकसान होईल असे म्हणत विरोध नोंदविला. महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा सकाळी अकराला महापालिकेतील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात झाली. सभापती लताबाई पोतदार, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. सभेत मानधनावरील वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, कनिष्ठ अभियंता, व्हॉल्व्हमन, पंपचालक, गाळणी चालक, विजतंत्री, रसायन तज्ज्ञ, सुपर फिल्ड वर्कर, संगणक लिपीक यांना सहा महिने फेरनियुक्तीचा विषय मंजूर करण्यात आला. दरम्यान, महापालिका मुख्यालय व अधिनस्त कार्यालयांमध्ये विविध संवर्गातील पदांसाठीचे मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन घेण्यासाठी प्राप्त निविदा दर मान्यतेचा विषय होता. या मनुष्यबळ पुरवठ्यासाठी वार्षिक एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी सात निविदा प्राप्त होत्या, त्यापैकी सहा निविदाधारकांचे सेवा शुल्क न्यूनतम दर (एल-१) सारखेच अर्थात ३.८५ प्राप्त झाले. या सहाही निविदाधारकांची आयुक्तांकडे बैठक झाली. बैठकीत सहाही निविदाधारकांना अल्फाबेटीकली समप्रमाणात मनुष्यबळ पुरवठ्याचे काम देण्याचा निर्णय झाला व दर मंजूरीसाठी स्थायीपुढे ठेवण्यात आला. स्थायीत सत्ताधारी सदस्य अमोल मासुळे यांनी यापूर्वी असे काम दिले आहे का अशी विचारणा करत समान काम कसे देणार, अडचणी निर्माण होतील, भेदभावाचा आरोप होईल, असे नमूद करत एकाच एजन्सीला काम द्यावे, अशी मागणी केली व विषय तहकुब ठेवण्याची मागणी केली. त्यानुसार विषय तहकुब करण्यात आला. जाहिरात दर निम्म्यावर गणेशोत्सवानिमित्त तात्पुरत्या स्वरुपात जाहिरात शुल्क प्रति चौरस फुट चार रुपयावरुन दोन रुपये आकारण्याचा विषय होता. या विषयावर सत्ताधारी भाजप सदस्य कृपेश नांद्रे, अमोल मासुळे, योगिता कुटे, निलेश नेमाणे, योगिता कुटे यांनी दर कमी करण्याची मागणी केली. शिवसेना सदस्य धीरज कलंत्री यांनी मात्र महापालिकेचे यामुळे नुकसान का करायचे, ज्यांना बॅनर लावायचे ते पैसे भरतील असे म्हणत दर कमी करु नये अशी भूमिका मांडली. दरम्यान, हा विषय धोरणात्मक असल्याने त्यावर महासभेतच निर्णय होईल. स्थायी समितीने याबाबत फक्त शिफारस करावी, असे नगरसचिव वाघ यांनी स्पष्ट केले. महापौरांच्या पत्रानुसार हा विषय घेण्यात आला होता, त्यावर प्रशासनाने अंमलबजावणीही सुरू केली आहे हे विशेष. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT