नाशिक

रोटरी युथ लीडरशिप दोन दिवसीय कार्यशाळेत सहा राज्यातील ११० युवक - युवतींचा सहभाग

CD
राज्यातील युवकांसाठी जळगावात कार्यशाळा जळगाव, ता. १२ : रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड्स अर्थात ‘रायला’ या दोन दिवसीय कार्यशाळेत महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू व कर्नाटक या सहा राज्यांतील १८ ते ३० वर्षे वयोगटातील ११० युवक-युवतींनी सहभाग घेतला. त्यात ब्राझील व मेक्सिको या देशांतील दोन विद्यार्थ्यांचीही पूर्णवेळ विशेष उपस्थिती होती. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०अंतर्गत आयोजित या कार्यशाळेचे रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट व रोटरॅक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांनी यजमानपद भूषविले. आर्यन इको रिसॉर्ट येथे दीपस्तंभ-मनोबलचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांच्या हस्ते वृक्षांना पाणी देऊन कार्यशाळेचा शुभारंभ झाला. रोटरी जळगाव वेस्टचे अध्यक्ष योगेश राका, इव्हेंट समन्वयक ॲड. सूरज जहांगीर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ‘रायला’चे चेअरमन कुशल चौधरी यांनी केले. सचिव ओम नेहेते यांनी आभार मानले. निधी कोठारी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेत तुषार दोडिया (बुलडाणा), डॉ. सोमा जयस्वाल (कलकत्ता), परेश चिटणीस (नाशिक), डॉ. मयूर मुठे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. राजेश पाटील, माजी प्रांतपाल डॉ. आनंद झुंनझुनवाला यांची प्रमुख उपस्थिती होती. डीआरसीसी शंतनू अग्रवाल यांनी पुरस्कारांची घोषणा केली. रोटरी वेस्टचे मानद सचिव बिपिन काबरा, कृष्णकुमार वाणी, विनीत जोशी, गौरव सफळे, केकल पटेल, निखिल बियाणी, हकीम बुटवाला, देवेश कोठारी, सुदाम वाणी, संगीता घोडगावकर आदींचे सहकार्य लाभले.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT