आवश्यक बातमी
--
फोटो : H29310
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते
साहेबराव पाटील यांचे निधन
नाशिक, ता. १० : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त क्रीडा संघटक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण संघचालक, महाराष्ट्र राज्य हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष, तसेच मायकोचे निवृत्त कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेले साहेबराव पाटील यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने नाशिकच्या क्रीडा, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
श्री. पाटील यांनी क्रीडा क्षेत्रासाठी आपले आयुष्य समर्पित केले. विशेषतः हँडबॉल खेळाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. खेळाडूंना प्रोत्साहन देणे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे, तसेच क्रीडा संघटनांना बळकटी देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातूनही त्यांनी ग्रामीण भागात संघटनात्मक कार्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी समाजोपयोगी उपक्रमांना हातभार लावला. मायकोमध्ये दीर्घकाळ सेवा बजावल्यानंतर निवृत्त झालेल्या श्री. पाटील यांचा विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. शांत, शिस्तप्रिय, मनमिळाऊ आणि कार्यकर्त्यांना सदैव प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच क्रीडा, सामाजिक, औद्योगिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने एक समर्पित क्रीडा संघटक आणि सामाजिक कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.