नाशिक

रावल गढी बैलपोळा

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H29311 दोंडाईचा : बैलपोळ्यानिमित्त रावल गढीवर बैलांची पूजा करुन त्यांना धान्य खावू घालतांना मंत्री जयकुमार रावल व परिवार. --- रावल गढीवर बैलपोळा उत्साहात साजरा --- मंत्री रावल यांच्या हस्ते मानाच्या बैलजोडीचे सपत्नीक पूजन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १० : दोंडाईचा येथील रावल गढीवर पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. रावल संस्थानच्या ऐतिहासिक परंपरेनुसार गढीच्या मानाच्या बैलजोडीची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीस शिवालय मंदिरापासून सुरुवात झाली. या वेळी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रावल यांनी मिरवणुकीत रावल संस्थानपर्यंत सहभाग नोंदविला. त्यानंतर त्यांनी सपत्नीक रावल गढीच्या मानाच्या बैलजोडीचे विधिवत पूजन करून शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. मिरवणूक जुना गावदरवाजा, आझाद चौक, निंबा चौक, मुन्ना चौक मार्गे रावल संस्थान येथे पोहोचली. पारंपरिक वेशभूषा, सजविलेली मानाची बैलजोडी आणि नागरिक सहभागी झाले. या वेळी रावल गढीचे प्रमुख सरकारसाहेब रावल, लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, दिवाणजी रूपसिंग गिरासे, संदीप जमादार, नरेंद्र राजपूत यांच्यासह शहरातील नगरसेवक, शेतकरी, व्यापारी व नागरिक उपस्थित होते. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्यातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी; पोलिस उपायुक्ताकडून आदेश जारी

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT