NSK26H29335
भुसावळ : पाटील मळा परिसरात गुरुवारी रात्री घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस अधिकारी.
---
रेल्वे कर्मचाऱ्याचा
भुसावळ येथे खून
---
दुचाकीवर जाताना मागून केले चाकूने वार
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. १० : शहरातील पाटील मळा परिसरात दुचाकीवरून जात असलेले रेल्वे कर्मचारी तुषार गोविंदा सोनवणे (वय ३५, रा. श्रावस्तीनगर, भुसावळ) यांच्यावर मागून येऊन चाकूने सपासप वार करण्यात आले. यात सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १०) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. सोनवणे रेल्वेच्या एम.ओ.एच. शेडमध्ये कर्मचारी असल्याची माहिती मिळाली.
प्राथमिक माहितीनुसार, तुषार सोनवणे दुचाकीवरून पाटील मळा परिसरातून जात असताना, एका अल्पवयीन मुलाने पाठीमागून येत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात सोनवणे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती बाजारपेठ पोलिस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक केदार बरबोले, परिविक्षाधीन अधिकारी प्रशांत दरेकर, पोलिस निरीक्षक राहुल वाघ, गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून हल्ल्याबाबत माहिती घेतली.
हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला? यामध्ये सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाची भूमिका काय आहे, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेची पुढील कायदेशीर प्रक्रिया बाजारपेठ पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, हा खून कोणत्या कारणामुळे झाला, याचाही तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.