नाशिक

बँक कर्मचारी संप

CD
NSK26H29367 जळगाव : स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेबाहेर शुक्रवारी निदर्शने करताना बँक कर्मचारी. --- बँक कर्मचाऱ्यांचा संप; ८०० कोटींचे व्‍यवहार ठप्‍प (उपशीर्षक) पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी; सलग चार दिवस बँका बंद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ११ ः राष्ट्रीयकृत बँकांचाही पाच दिवसांचा आठवडा तत्काळ लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. ११) युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सतर्फे देशव्‍यापी संप पुकारला आहे. संपात जळगाव जिल्‍ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांमधील १२०० हून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले होते. यामुळे साधारण ८०० कोटी रूपयांचे व्‍यवहार ठप्‍प झाले. संपामुळे बँकांमध्‍ये आलेल्‍या नागरिकांना परत जावे लागले. दरम्यान, संपामुळे बँका पुढील चार दिवस बंद राहणार आहेत. संपामुळे शुक्रवारी व्‍यवहार बंद होते. दुसरा शनिवारी (ता. १२), नंतर रविवारी (ता. १३) व सोमवारी (ता.१४) गणेश चतुर्थीनिमित्त सुटी आहे. यामुळे बँकांमधील व्‍यवहार चार दिवस बंद राहणार असल्‍याने ग्राहकांची गैरसोय होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी स्‍टेट बँकच्‍या मुख्‍य शाखेसमोर निदर्शने केली. स्‍टेट बँकेचे प्रसाद पाटील, मिलिंद पाटील, धिरज भगत, पंजाब नॅशनल बँकेचे धिरज वर्मा, श्‍याम चौधरी, बँक ऑफ इंडियाचे किशोर वर्मा, सेंट्रल बँकेचे भरत जाधव, बँक ऑफ महाराष्ट्रचे मोहन खेनवलकर, बँक ऑफ बडोद्याचे नीलेश शिपालकर यांच्‍यासह कर्मचारी मोठ्या संख्‍येने सहभागी झाली होते. बँकिंग सेवांवर होणारा परिणाम संपात सहभागी होणाऱ्या शाखा व कार्यालयांमध्ये नियमित बँकिंग कामकाजावर परिणाम होऊ शकतो. रोकड जमा करणे व काढणे, क्लिअरिंगशी संबंधित काम, सेफ डिपॉझिट/ लॉकर सेवा आणि इतर शाखास्तरीय व्यवहारांमध्ये अडथळा येऊ शकतो. डिजिटल व इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवा तांत्रिक व कार्यान्वयनाच्या उपलब्धतेनुसार सुरू राहू शकतात. डिजिटल व इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवामुळे आता बँकिंग व्यवहार पूर्णपणे बंद राहत नाही. त्यामुळे पाचदिवसीय आठवडा करण्यास काहीही हरकत नसल्‍याचे नमूद केले आहे. इन्‍फो तीन दिवसांचा संप संपानंतरही मागण्या वेळेत मान्य न झाल्यास येत्या २८ ते ३० सप्टेंबर, असे तीन दिवस बँक युनियन आणि बँक कर्मचारी संपावर राहतील, असा इशारा युनायटेड फॉर्म ऑफ बँक युनियनने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT