शहर टुडे पानासाठी
---------------
जळगावातील श्रीराम मंदिरात
गणेश उत्सवानिमित्त आराधना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.११ : जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे श्रीराम मंदिरात जळगावचा सर्वात जुना, प्रथम पार्थिव श्री गणपती स्थापनेस प्रारंभ झाला. मूर्तिकार दशपुत्रे यांच्याकडून शाडूमातीचा गणपती तयार करून श्रीराम मंदिराला भेट देण्याची सेवा परंपरा अजून दशपुत्रे परिवार सांभाळत आहे.
श्री सद् गुरू आप्पा महाराज यांनी प्रारंभ केलेला जळगावातील सर्वात जुना श्रीगणेश उत्सव परंपरेनुसार श्रीराम मंदिरात साजरा करण्यात येतो. येत्या सोमवारी (ता.१४) श्री गणेश चतुर्थीदिनी पहाटे काकड भजन, आरती पार्थिव श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संस्थानचे प्रमुख विश्वस्त, विद्यमान गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते होईल.
सकाळी नऊ ते १० हरितालिका पूजन विधी सेवा, आरती होईल. दुपारी बाराला माध्यान्ही श्रीगणरायास महानैवेद्य आरती सेवा होईल. हरदिनी नित्यनेमाने सायंकाळी पाचला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ, भजन, संध्याकाळी साडेसहाला संध्या आरती सेवा होईल. पंधरा सप्टेंबरला रात्री साडेआठला ऋषीपंचमीनिमित्त श्रीराम महाराज यांचे प्रवचन सेवा होईल. १९ सप्टेंबरला दुपारी चारला गोकर्ण कथा सेवा, २० सप्टेंबरला भागवत कथा सेवा सप्ताह सुरू होईल. सकाळी आठ ते ११ संस्कृत संहिता पठण, दुपारी २ ते ६ मराठी भावार्थ. २२ सप्टेंबरला परिवर्तिनी एकादशीनिमित्ताने संध्याकाळी सातला भजनाचा कार्यक्रम, २३ला वामन द्वादशीनिमित्त श्री सत्यविनायक पूजा सकाळी ११ला होईल. २५ सप्टेंबरला श्री अनंत चतुर्दशी पार्थिव श्री गणेश विसर्जन होईल. २६ सप्टेंबरला सायंकाळी पाचला सामूहिक श्री भगवगीता पठण श्री भागवत सप्ताह समाप्ती होईल. श्रीराम मंदिरात श्रीराम महाराज, श्री सद् गुरु आप्पा महाराज समाधी मंदिरात मुकुंद धर्माधिकारी भागवत कथा करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.