नाशिक

सरपंच महासंघ सर्वोच्च न्यायालयात जाणार

CD
सरपंच महासंघ सर्वोच्च न्यायालयात जाणार --- दोनपेक्षा अधिक अपत्यांच्या निवडणूक अपात्रता प्रकरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ११ : दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविणाऱ्या तरतुदीविरोधात दाखल असलेल्या याचिकेचा निकाल तातडीने लावावा, अशी आर्जव घेऊन सरपंच महासंघ सर्वोच्च न्यायालयात त्रयस्थ अर्जदार म्हणून सहभागी होणार आहे. आधीच सुनावणी पूर्ण झालेल्या या प्रकरणात हस्तक्षेप करून निर्णय लवकर देण्याची मागणी करण्यात येणार असल्याची भूमिका सरपंच महासंघाचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी घेतली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम १४ (१) (जे-१) नुसार दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. या तरतुदीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी ‘मंगला भीमराव इंगळे विरुद्ध महाराष्ट्र शासन’ ही विशेष अनुमती याचिका (एसएलपी क्रमांक ३०७७२/२०२५) सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, आता न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे. दुसरीकडे राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रश्नाचा निर्णय निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी होणे आवश्यक असल्याचे सरपंच महासंघाचे म्हणणे आहे. राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून दोनपेक्षा अधिक अपत्यांच्या आधारावर निवडणूक लढविण्यावरील निर्बंधांमध्ये बदल केल्याचा दाखला देत महाराष्ट्रातील तरतुदीचाही पुनर्विचार व्हावा, अशी भूमिका ग्रामगौरव फाउंडेशन कृत महाराष्ट्र ग्रामविकास परिषद सरपंच महासंघाची असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. चौकट इच्छुकांनी सहअर्जदार व्हावे दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याने क्षमता असतानाही निवडणूक लढविण्यास तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरण्याची भीती असणाऱ्या राज्यातील इच्छुकांना महासंघाच्या त्रयस्थ अर्जात सह-अर्जदार म्हणून सहभागी होता येणार असून, यासाठी विवेक ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT