नाशिक

जिल्ह्यात एम-सँड युनिटसाठी संधी

CD
एम-सँड युनिटसाठी जिल्ह्यात अर्ज मागविले नाशिक, ता. ११ : राज्य सरकारच्या एम-सँड धोरणांतर्गत जिल्ह्यात कृत्रिम वाळू (एम-सँड) निर्मिती युनिट उभारणीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात एम-सँड धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या धोरणांतर्गत एम-सँड युनिट उभारणीसाठी परवानगी देण्याची प्रक्रिया जिल्हा खनिकर्म विभागाने सुरू केली असून, इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. अर्जासोबत मिळकतीचा चालू सातबारा उतारा जोडणे आवश्यक आहे. वैयक्तिक अर्जदारांनी आधारकार्ड व पॅनकार्ड, तर संस्थांनी संस्थेशी संबंधित कागदपत्रे जोडावीत. याशिवाय ५०० रुपये अर्ज शुल्क तसेच युनिट उभारावयाच्या ठिकाणचे पर्यावरणीय व इतर आवश्यक परवानगी प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. एम-सँड उत्पादनासाठी दगड कोणत्या खाणपट्ट्यातून किंवा इतर स्रोतांतून आणला जाणार आहे, त्याचा तपशील अर्जात नमूद करावा लागेल. संबंधित खाणपट्टा अथवा स्रोताबाबतचे उद्योग आधार प्रमाणपत्रही जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी एम-सँड उत्पादन करणाऱ्या युनिटधारकांनी ‘महाखनिज’ संगणक प्रणालीवर अर्ज केला असल्यास, त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Diwali gift to Farmers : नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून जुंपली असतानाच 'गोकुळ'चा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणार 'इतके' रुपये

Marathi News Live Updates : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

मुंबईच्या नॅशनल क्रिकेट क्लबच्या 'टॅलेंट हंट'मधून ४५ प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची निवड!

Dhoni ने स्मृती मानधनाला वर्ल्ड कप जिंकल्यावर WhatsApp वर केला खास मेसेज; कॅप्टनकूल म्हणाला, 'फक्त तिचाच नंबर माझ्याकडे...'

SCROLL FOR NEXT