ई-केवायसीसाठी ३० सप्टेंबरची अंतिम मुदत
पुरवठा विभाग : अंत्योदय, प्राधान्य कुटुंबांनी नोंदणी करावी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य रेशनकार्डधारक लाभार्थी कुटुंबांसाठी ई-केवायसीची ३० सप्टेंबरपर्यंत शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थी कुटुंबांतील ज्या सदस्यांनी अद्यापही ई-केवायसी नोंदणी केली नसेल त्यांनी महिनाअखेरपर्यंत रेशन दुकानांमध्ये जाऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी केले आहे.
जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत ३६ लाख ७२ हजार चार लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना रेशन दुकानांच्या माध्यमातून धान्य वितरण करण्यात येतेे. त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत एकूण लाभार्थ्यांपैकी ३१ लाख ७२ हजार ३४० (८६.३९ टक्के) लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. अद्यापही चार लाख ९९ हजार ६६४ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे.
सरकारतर्फे शिधापत्रिकेसोबत संलग्न केलेला आधार क्रमांक बरोबर आहे का? तसेच शिधापत्रिकेमध्ये नमूद व्यक्ती आणि आधार क्रमांक संबंधित व्यक्तीचाच आहे, याची खातरजमा केली जात आहे. त्यासाठी ई-केवायसी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे लाभार्थ्याचे प्रमाणीकरण करण्यात येते. त्यामुळे शासकीय अन्नधान्याचा लाभ सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी लाभार्थ्यांनी मुदतीत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचदृष्टीने रेशन दुकानांमध्ये जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिधापत्रिकाधारक लाभार्थी
एकूण लाभार्थी : ३६,७२,००४
ई-केवायसी पूर्ण : ३१,७२,३४०
ई-केवायसी बाकी : ४,९९,६६४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.