नाशिक

मातीला आकार देत विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

CD
NSK26H29361 जळगाव : गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्‍यवर. ––– विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ११ : केसीईएसच्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात रोटरॅक्ट क्लब ऑफ सीओईएमच्या वतीने गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गणपतीमूर्ती निर्मिती कार्यशाळा व स्पर्धेत १७४ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविल्‍या. गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेसाठी दिव्या पमनानी यांची विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कला प्रत्यक्ष शिकविताना मूर्तीनिर्मितीतील विविध बारकावे समजावून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मातीला कलात्मक आकार देत आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. कार्यशाळेला व्यवस्थापन पदव्युत्तर, पदविका आणि अभियांत्रिकी विभागातील तब्बल १७४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या कल्पकतेचा आणि कलाकौशल्याचा आविष्कार सादर केला. कार्यक्रमाला संस्थेचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. प्राजक्ता पाटील, सुनील विसपुते यांच्‍यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी समन्वयक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. चौकट विजेत्यांना आकर्षक बक्षिसे कार्यशाळेसोबतच गणपतीमूर्ती निर्मिती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृतींची निवड करून प्रत्येक विभागातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करण्यात येणार असून, विजेत्यांना आकर्षक पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व १७४ विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविकही भारावले, पाहा खास फोटो

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

SCROLL FOR NEXT