नाशिक

ब्रेनडेड तेजसमुळे चार रुग्‍णांना मिळाले नवजीवन

CD
तेजसमुळे चार रुग्‍णांना मिळाले नवजीवन कुटुंबीयांनी जपले सामाजिक भान; हृदय मुंबईला, यकृत पुण्याला पाठविले सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ११ : समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय तेजस गायकवाड या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्‍यू झाला. दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना गायकवाड कुटुंबीयांनी दाखवलेल्या दातृत्वामुळे चार रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. तेजसच्या अवयवदानासाठी प्रशासनाने तातडीने रस्ता व हवाईमार्गे ग्रीन कॉरिडॉर तयार केला. हृदय विमानाने मुंबईत, तर यकृत आणि मूत्रपिंड पुण्यात तर नाशिकमध्ये त्वचा व नेत्र अवघ्या काही तासांत यशस्वीरीत्या पोहोचवले. आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व मविप्र रुग्णालयात तेजसवर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्याला ‘ब्रेनडेड’ घोषित केल्यानंतर अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकिबे यांनी झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (झेडटीसीसी) ची परवानगी घेतली. त्यांच्या समुपदेशनानंतर गायकवाड कुटुंबीयांनी सामाजिक भान जपत अवयवदानाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ---चौकट ग्रीन कॉरिडॉर ठरली महत्त्वाची नाशिक विमानतळ ते मुंबई विमानतळ असा विशेष एअर ग्रीन कॉरिडॉर तयार करून तेजसचे हृदय मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात पोहोचविले. एक मूत्रपिंड पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात, तर यकृत रुबी हॉल रुग्णालयाला पाठविले. याशिवाय, दोन्ही नेत्र मविप्र रुग्णालयातील नेत्रपेढीस आणि त्वचा नाशिक येथील डॉ. नेहते रुग्णालयातील त्वचापेढीत दान केली. एक मूत्रपिंड नाशिकमध्ये मविप्र रुग्णालयात दान करून यशस्वीरीत्या प्रत्यारोपण केले. --- कोटः तेजसचा अपघातात दुर्दैवाने मेंदू मृत झाला. मात्र, दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही त्याच्या आई-वडिलांनी आणि नातेवाइकांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय समाजोपयोगी, प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. - ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Lakhani Bolero Accident : माहेरची वाट धरली अन् काळाने घाला घातला; तीजसाठी निघालेल्या ९ जणींचा अपघातात करुण अंत

MPPSC Inspiring Story : अपघातामुळं 20 व्या वर्षी सोडली DSP ची नोकरी, लोकांनी उडवली खिल्ली; जिद्दीच्या जोरावर प्रशांत बनला डेप्युटी कलेक्टर

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT