नाशिक

ज्येष्ठ दिव्यांग नागरिकांना साहित्य मोफत उपलब्ध करणार - चंद्रकांत रघुवंशी

CD
फोटो : NSK26H29362 नंदुरबार : ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभेत बोलताना प्रतापराव चव्हाण. शेजारी संस्थेचे अध्यक्ष वसंत चौधरी, राधेश्याम सोनार, सोमनाथ शिंपी, राजाराम निकम, के. डी. गिरासे, देवकन्या सोनार, रंजना शिंपी, लता टेंभेकर. --------- शासनाच्या सवलती ज्येष्ठांपर्यंत पोहचाव्यात प्रतापराव चव्हाण : ज्येष्ठ नागरीक संस्थेची सभा उत्साहात सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १२ : ग्रामीण भागात संघाचा विस्तार वाढविला पाहिजे. खेड्या- पाड्यातून संघ स्थापन करून शासनाच्या सवलती सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजे, असे प्रतिपादन नंदुरबार ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण यांनी केले. तालुका ज्येष्ठ नागरिक संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा शहरातील श्री दंडपाणेश्वर येथील सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष वसंतराव चौधरी होते. सोमनाथ शिंपी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. सचिव राधेश्याम सोनार यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल वाचून दाखविला. मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त व संस्थेचा अहवाल सादर करून मंजूर केला. वयाची ८० वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा या वेळी सत्कार करण्यात आला. नवीन सभासदांचे स्वागत करण्यात आले. संस्थेने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालाची चव्हाण यांनी या वेळी प्रशंसा केली. फेस्कामचे संघटन सचिव कोमलसिंग गिरासे यांनी सभेला संबोधीत केले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही मार्गदर्शन केले. ज्येष्ठ दिव्यांग नागरिकांसाठी सर्व प्रकारचे साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महिला आघाडीच्या अध्यक्षा देवकन्या सोनार यांनीही सभेला मार्गदर्शन केले. कार्याध्यक्ष सोमनाथ शिंपी यांनी आभार मानले. सभा यशस्वीतेसाठी राजाराम निकम सहसचिव, कोषाध्यक्ष दरबारसिंग गिरासे, देविदास वसईकर, रामा बुधा, दत्तात्रेय शिंपी, अनिल शंकरराव चौधरी, रवींद्र रघुवंशी यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT