नाशिक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

CD
कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर नंदुरबार जिल्ह्यातील १ हजार ३४५ लाभार्थ्यांचा समावेश सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ११ : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी शुक्रवारी (ता.११) प्रसिद्ध करण्यात आली. यात धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच विविध राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमधील एकूण १ हजार ३४५ लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांनी दिली. ही यादी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी कार्यालय आणि बँक शाखांच्या स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीतील पात्र लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण विनाशुल्क करून घ्यावे. पात्र यादीतील शेतकऱ्यांकडून कोणतीही रक्कम वसूल न करता शासनाच्या नियमांनुसार व निकषांनुसार कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना सर्व राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांना देण्यात आल्या आहेत. या टप्प्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरणाऱ्या इतर शेतकऱ्यांची नवीन यादीदेखील लवकरच जाहीर केली जाणार आहे. या प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही शेतकऱ्याला काही अडचण किंवा तक्रार असल्यास त्यांनी ऑनलाइन तक्रार दाखल करावी. तसेच ऑफलाइन स्वरूपात संबंधित सहायक निबंधक कार्यालयात किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अर्ज करता येईल. प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तक्रार निवारण समितीमार्फत योग्य तो निर्णय व कार्यवाही केली जाईल. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी नजीकच्या ‘आपले सरकार सेवा’ केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी तसेच जिल्हा उपनिबंधक एस.वाय. पुरी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविकही भारावले, पाहा खास फोटो

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

SCROLL FOR NEXT